प्रजासत्ताक दिन संचलनात महिला अग्निवीर झळकणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची परेड खूप खास असणार आहे. वास्तविक, यावेळी प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिला अग्निवीर भारतीय हवाई दलाच्या तुकडीचा भाग असतील. भारतीय हवाई दलानेही याला दुजोरा दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच लष्कर, भारतीय नौदल आणि हवाई दलातील महिला अग्निवीर जवानांची संयुक्त तुकडी असेल. या तिन्ही दलातील महिला अधिकारी या पथकाचे […]

प्रजासत्ताक दिन संचलनात महिला अग्निवीर झळकणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची परेड खूप खास असणार आहे. वास्तविक, यावेळी प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महिला अग्निवीर भारतीय हवाई दलाच्या तुकडीचा भाग असतील. भारतीय हवाई दलानेही याला दुजोरा दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रथमच लष्कर, भारतीय नौदल आणि हवाई दलातील महिला अग्निवीर जवानांची संयुक्त तुकडी असेल. या तिन्ही दलातील महिला अधिकारी या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. लष्कर, भारतीय नौदल आणि हवाई दलाच्या महिला अधिकारी एकत्रितपणे परेडचे नेतृत्व करणार असल्याचे प्रथमच घडत आहे. आतापर्यंत तिन्ही दलांच्या संयुक्त तुकडीने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला नव्हता. यंदा मात्र लष्कर, नौदल आणि हवाई दलातील महिला अग्निवीरांची पथके समांतर संचलन करणार आहेत. तथापि, तिन्ही सैन्याच्या परेडिंगच्या शैलीत फरक असणार आहे.