लातूरमध्ये भाजी विक्रेत्याकडून महिलेचा विनयभंग, भाजी विक्रेताला अटक
सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ होत आहे.लातूरच्या बाजारपेठेत एका भाजी विक्रेत्याने 24 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी महात्मा फुले भाजी मंडईत तरुणी भाजी विकत घेताना घडली आहे. या प्रकरणी काही हिंदू संघटनांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच शुक्रवारी हिंदू संघटनांनी बंदच्या आवाहन केल्यामुळे बाजारपेठ बंद होता.
पीडित महिलेने या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने म्हटले की, सकाळी भाजी खरेदी करत असताना भाजी विक्रेत्याने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केले. प्रत्युत्तर महिलेने भाजी विक्रेत्याला कानशिलात लगावली. नंतर कुटुंबियांसमवेत पोलीस ठाण्यात जाऊन भाजी विक्रेत्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.महिलेच्या तक्रारीवरून आरोपी भाजी विक्रेत्याला अटक केली आहे.
Edited by – Priya Dixit