Hit-And-Run : वरळीत वेगवान बीएमडब्ल्यूने महिलेला उडवले
वेगवान बीएमडब्ल्यूने (BMW) दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे. मुंबईतील वरळीत (Worli) हा प्रकार घडला आहे. मद्यप्राशन करुन बेदरकारपणे बीएमडब्ल्यू चालवणारा चालक सध्या फरार आहे. दरम्यान पोलिसांनी शिवसेना उपनेते असणारे त्याचे वडील आणि चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघातात जखमी झालेले प्रदीप नाखवा यांनी सांगितलं की, “अपघात सकाळी 5.30 वाजता झाला. कार मागून आली आणि स्कूटरला धडकली. आमची गाडी एका कोपऱ्यातून 30-35 च्या स्पीडने चालली होती. धडक दिल्यानंतर आम्हाला काही वेळ काय झालं ते समजलंच नाही. आम्ही बोनेटवर पडलो. मी त्याला थांब म्हटल्यावर त्याने ब्रेक मारला असता आम्ही दोघे खाली पडलो. मी डाव्या बाजूला पडलो. मी तिला खेचणार तितक्यात त्याने तिच्या अंगावर गाडी घातली आणि फरफटत नेली. सीजी हाऊस ते सी-लिंक किती लांब आहे, काय तिची अवस्था झाली असेल सांगा”. “मला दोन मुलं आहेत, आता मी काय करणार? हे मोठे लोक आहेत, कोणी काही करणार नाही. आम्हालाच त्रास होईल”, अशी हतबलताही त्यांनी बोलून दाखवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये हत्या, बेदरकारपणे वाहन चालवणं आणि पुरावे नष्ट करणे यांचा समावेश आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतंल आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान मिहीर शाह फरार असून पोलिसांची चार पथके त्याचा शोध घेत आहेत.हेही वाचामुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या : आदित्य ठाकरे
Home महत्वाची बातमी Hit-And-Run : वरळीत वेगवान बीएमडब्ल्यूने महिलेला उडवले
Hit-And-Run : वरळीत वेगवान बीएमडब्ल्यूने महिलेला उडवले
वेगवान बीएमडब्ल्यूने (BMW) दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे. मुंबईतील वरळीत (Worli) हा प्रकार घडला आहे. मद्यप्राशन करुन बेदरकारपणे बीएमडब्ल्यू चालवणारा चालक सध्या फरार आहे. दरम्यान पोलिसांनी शिवसेना उपनेते असणारे त्याचे वडील आणि चालकाला ताब्यात घेतलं आहे.
अपघातात जखमी झालेले प्रदीप नाखवा यांनी सांगितलं की, “अपघात सकाळी 5.30 वाजता झाला. कार मागून आली आणि स्कूटरला धडकली. आमची गाडी एका कोपऱ्यातून 30-35 च्या स्पीडने चालली होती. धडक दिल्यानंतर आम्हाला काही वेळ काय झालं ते समजलंच नाही. आम्ही बोनेटवर पडलो. मी त्याला थांब म्हटल्यावर त्याने ब्रेक मारला असता आम्ही दोघे खाली पडलो. मी डाव्या बाजूला पडलो. मी तिला खेचणार तितक्यात त्याने तिच्या अंगावर गाडी घातली आणि फरफटत नेली. सीजी हाऊस ते सी-लिंक किती लांब आहे, काय तिची अवस्था झाली असेल सांगा”.
“मला दोन मुलं आहेत, आता मी काय करणार? हे मोठे लोक आहेत, कोणी काही करणार नाही. आम्हालाच त्रास होईल”, अशी हतबलताही त्यांनी बोलून दाखवली.
पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये हत्या, बेदरकारपणे वाहन चालवणं आणि पुरावे नष्ट करणे यांचा समावेश आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते राजेश शाह आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतंल आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान मिहीर शाह फरार असून पोलिसांची चार पथके त्याचा शोध घेत आहेत.हेही वाचा
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या : आदित्य ठाकरे