मुलाला विष पाजल्यावर स्वतः गळफास घेऊन महिलेची आत्महत्या
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने आपल्या 9 महिन्यांच्या मुलाला विष पाजले.सुदैवाने या घटनेत मुलगा बचावला. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणी मयत महिलेच्या आईने मुलीचा छळ केल्याचा आरोप सासरच्यांवर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बीके गावातील आहे. घरात कोणीही नसताना आत्म्हत्यापूर्वी महिलेने आपल्या 9 महिन्याच्या मुलाला कीटकनाशक पाजले. नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियातील सदस्यांनी घरी आल्यावर तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पहिले आणि याची सूचना पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला आणि मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी महिला मृत घोषित केले. मुलाला प्राथमिक उपचारानंतर चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात पाठविले. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी महिलेच्या आईने महिलेच्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केली असून छळ करण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि सासरच्या लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील शोध घेत आहे.
Edited by – Priya Dixit