आठ जणांकडून उमेदवारी अर्ज माघार

13 जण निवडणुकीच्या रिंगणात बेळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दि. 22 हा शेवटचा दिवस होता. त्यानुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघातून आठ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी दि. 12 एप्रिलपासून अधिसूचना जारी करण्यात आली होती. 19 पासून उमेदवारी दाखल करण्यास […]

आठ जणांकडून उमेदवारी अर्ज माघार

13 जण निवडणुकीच्या रिंगणात
बेळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी दि. 22 हा शेवटचा दिवस होता. त्यानुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघातून आठ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी दि. 12 एप्रिलपासून अधिसूचना जारी करण्यात आली होती. 19 पासून उमेदवारी दाखल करण्यास प्रारंभ झाला. 20 रोजी छाननी करण्यात आली आहे. तर 22 रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अंतिम दिवस  होता. त्यानुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघातून 30 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 29 अर्ज वैध ठरविण्यात आले होते. यापैकी आठ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून 13 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्यांमध्ये हणमंत शिवाप्पा नागनूर, ईश्वर चिक्कनरगुंद, भारती बैलाप्पा निरलकेरी, सागर पाटील, दो•ाप्पा इराप्पा दोडमनी, महांतेश डी. निरवाणी, महांतेश गौडर, मगदूम इस्माईल मगदूम अशी उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्यांची नावे आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात म. ए. समिती उमेदवार महादेव पाटील, काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर, भाजप उमेदवार जगदीश शेट्टर, अपक्ष विजय मेत्राणी, आश्पाक अहम्मद उस्ताद, नितीन अशोक म्हाडगुत, कम्युनिस्ट पक्ष लक्ष्मण जदगण्णावर, अपक्ष अशोक पंडाप्पा हंजी, पुंडलिक इटनाळ, बहुजन समाजवादी पार्टी अशोक अप्पय्या अप्पुगोळ, अपक्ष रवी शिवाप्पा पडसलगी, कर्नाटका राष्ट्र समिती पक्ष बसाप्पा कुंभार, उत्तम प्रजाकीया पक्ष मल्लाप्पा चौगुला अशा प्रकारे 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.