पेन्सिलच्या सहाय्याने प्रतिकृती साकारल्या अन् त्या वास्तवतेला भिडल्या

-रंगबहार संस्थेच्या वर्धापन दिनी रेखाटन स्पर्धा प्रतिनिधी कोल्हापूर पंचगंगा घाट आणि छत्रपती घराण्याच्या समाधीस्थळ परिसरामधील मंदिराची शीघ्र रेखाटन (स्केचिंग) कलाकारांनी पेन्सिल पेनच्या साह्याने साकारली. या स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आल्या. कोल्हापूर, गडहिंग्लज, सांगली, बेळगाव, इचलकरंजी येथील लहानांपासून ते वयोवृध्द 70 कलाकारांनी सहभाग नोंदवला. निमित्त होते कलाक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रंगबहार संस्थेच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त पंचगंगा […]

पेन्सिलच्या सहाय्याने प्रतिकृती साकारल्या अन् त्या वास्तवतेला भिडल्या

-रंगबहार संस्थेच्या वर्धापन दिनी रेखाटन स्पर्धा
प्रतिनिधी
कोल्हापूर
पंचगंगा घाट आणि छत्रपती घराण्याच्या समाधीस्थळ परिसरामधील मंदिराची शीघ्र रेखाटन (स्केचिंग) कलाकारांनी पेन्सिल पेनच्या साह्याने साकारली. या स्पर्धा खुल्या गटात घेण्यात आल्या. कोल्हापूर, गडहिंग्लज, सांगली, बेळगाव, इचलकरंजी येथील लहानांपासून ते वयोवृध्द 70 कलाकारांनी सहभाग नोंदवला.
निमित्त होते कलाक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रंगबहार संस्थेच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त पंचगंगा घाट परिसरामध्ये संस्थेच्यावतीने रेखाटन स्पर्धेचे आयोजन केले होते.
दृश्य कलेच्या क्षेत्रात व्याख्यानं, प्रात्यक्षिके, संमेलने, कार्यशाळा, प्रदर्शने अशा उपक्रमांतून लोकजागरही केला आहे. शीघ्र रेखाटन (स्केचिंग) स्पर्धेत कलाकारांनी अनेक प्रतिकृती साकारल्या. सर्वच कलाकारांचे कला पाहून मान्यवरांनी कौतुक केले. या स्पर्धेत प्रथम फिरोज शेख, द्वितीय साईराज खुपेरकर तर तृतीय क्रमांक रोहित गायकवाड यांनी पटकावला.
उत्तेजनार्थ क्रमांकाने सौरभ देवेकर, अपूर्व पेडणेकर, ऐश्वर्या पाटील, आशेर फिलीप, अश्मी घाडगे यांना गौरवण्यात आले. ‘रंगबहार‘ संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव, सचिव संजीव संकपाळ यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजीव संकपाळ, विजय टिपुगडे, मनोज दरेकर, बबन माने यांनी काम पहिले. यावेळी प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, गजेंद्र वाघमारे, मनिपद्म हर्षवर्धन, राहुल रेपे, प्रवीण वाघमारे, अभिजीत कांबळे, सुधीर पेटकर, नागेश हंकारे, सर्वेश देवरुखकर, सुदर्शन वंडकर आदी उपस्थित होते.