विंडीज पराभवाच्या छायेत
वृत्तसंस्था /अॅडलेड
येथे सुरू असलेल्या विंडीज विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील गुरुवारी खेळाचा दुसरा दिवस गोलंदाजांचा ठरला. दिवसभरातील खेळात एकूण 14 बळी नोंदविले गेले. तर या कसोटीत विंडीजचा संघ पराभवाच्या छायेत वावरत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 283 धावा जमवित विंडीजवर 95 धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजची दुसऱ्या डावात स्थिती 6 बाद 73 अशी केविलवाणी झाली आहे.
या कसोटीमध्ये विंडीजचा पहिला डाव 188 धावात आटोपला विंडीजच्या डावात मॅकेंझीने एकाकी लढत देत अर्धशतक झळकवले. ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूड आणि कमिन्स यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने 2 बाद 59 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 283 धावात आटोपला. ट्रेव्हिस हेडच्या समायोचित शतकामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेता आली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात हेडने 3 षटकार आणि 12 चौकारांसह 119, लाबूशेनने 10, ग्रीनने 14, कॅरेने 15, मार्शने 5, स्टार्कने 10, कर्णधार कमिन्सने 12 तर लियॉनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24 धावा जमविल्या. विंडीजतर्फे शमार जोसेफ यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 94 धावात 5 तर रॉच आणि ग्रीव्हेस यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
95 धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीजची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली. हॅझलवूडच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजची स्थिती 22.5 षटकात 6 बाद 73 अशी झाली आहे. मॅकेंझीने 4 चौकारांसह 26, ग्रीव्हेसने 3 चौकारांसह 26, डिस्लिव्हाने 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमविल्या. हॅझलवूडने 18 धावात 4 तर ग्रीन आणि लिऑन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजचा संघ अद्याप 22 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 4 गडी खेळावयाचे आहेत. ऑस्ट्रेलियन संघ हा सामना शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या फरकाने जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव सर्व बाद 188 (मॅकेंझी 50, जोसेफ 36, हॅझलवूड 4-44, कमिन्स 4-41, स्टार्क आणि लिऑन प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया प. डाव 81.1 षटकात सर्व बाद 283 (ट्रेव्हिस हेड 119, लियॉन 24, कॅरे 15, ग्रीन 14, कमिन्स 12, शमार जोसेफ 5-94, रॉच 2-48, ग्रिव्हेस 2-36, ए. जोसेफ 1-55), विंडीज दु. डाव 22.5 षटकात 6 बाद 73 (मॅकेंझी 26, ग्रिव्हेस 24, डिस्लिव्हा खेळत आहे 17, हॅझलवूड 4-18, ग्रीन, लेयॉन प्रत्येकी 1 बळी).
Home महत्वाची बातमी विंडीज पराभवाच्या छायेत
विंडीज पराभवाच्या छायेत
वृत्तसंस्था /अॅडलेड येथे सुरू असलेल्या विंडीज विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीतील गुरुवारी खेळाचा दुसरा दिवस गोलंदाजांचा ठरला. दिवसभरातील खेळात एकूण 14 बळी नोंदविले गेले. तर या कसोटीत विंडीजचा संघ पराभवाच्या छायेत वावरत आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 283 धावा जमवित विंडीजवर 95 धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजची दुसऱ्या डावात स्थिती 6 बाद 73 अशी केविलवाणी […]