जगदीश शेट्टर यांना मोठ्या फरकाने विजयी करा
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव : केंद्रात भाजपचीच सत्ता येणार हे सर्वश्रुत आहे. जगदीश शेट्टर यांची राजकीय कारकीर्द व अनुभव पाहता निवडून आल्यावर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे अरभावी मतदारसंघात अधिकाधिक केंद्रीय प्रकल्प आणण्यासाठी शेट्टर यांना मोठ्या फरकाने विजयी करा, असे आवाहन अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केले. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी बुधवारी मुडलगी येथील मेळवंकीत प्रचारसभेत आमदार जारकीहोळी बोलत होते. यावेळी जगदीश शेट्टर म्हणाले, साठ वर्षांत झाला नाही, त्याहून अधिक विकास मोदी सरकारच्या काळात घडून आला. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुडलगी, अरभावी मतदारसंघात अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. अशीच कामे करून घेण्यासाठी भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन शेट्टर यांनी केले. भाजप सरकारने दहा वर्षात किसान सन्मान निधीद्वारे आर्थिक मदत केली आहे. किसान सन्मान निधीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कौटुंबिक गाडा चालविण्यास मदत होत आहे. अशाच इतर योजनांसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
विणकरांसाठी सदैव तत्पर
विणकरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप सरकार सदैव तत्पर आहे. रामदुर्ग तालुक्यात विणकरांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या समस्या भविष्यातही सोडविण्यासाठी जगदीश शेट्टर नेहमीच प्रयत्नशील असतील, असा विश्वास रामदुर्गचे माजी आमदार महादेवप्पा यादवाड यांनी व्यक्त केला. यावेळी उमेदवार जगदीश शेट्टर, आमदार जनार्दन रे•ाr, माजी मंत्री शंकर पाटील, विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, एम. डी. लक्ष्मीनारायण आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी जगदीश शेट्टर यांना मोठ्या फरकाने विजयी करा
जगदीश शेट्टर यांना मोठ्या फरकाने विजयी करा
आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे आवाहन बेळगाव : केंद्रात भाजपचीच सत्ता येणार हे सर्वश्रुत आहे. जगदीश शेट्टर यांची राजकीय कारकीर्द व अनुभव पाहता निवडून आल्यावर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे अरभावी मतदारसंघात अधिकाधिक केंद्रीय प्रकल्प आणण्यासाठी शेट्टर यांना मोठ्या फरकाने विजयी करा, असे आवाहन अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केले. भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर […]