पाकविरुद्धच्या मालिकेत विल्यम्सन न्यूझीलंडचा कर्णधार
वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी केन विल्यम्सनकडे पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व सोपविले आहे. नऊ महिन्यापूर्वी विल्यम्सनला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मागील महिन्यात बांगलादेशविरुद्धची वनडे व टी-20 मालिका हुकली होती. 33 वर्षीय विल्यम्सनने शस्त्रक्रियेनंतर भारतात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पुनरागमन केले होते. मात्र गेल्या महिन्यात मायदेशात झालेल्या मालिकांत त्याला विश्रांती देण्यात आली होती. पाकविरुद्धच्या मालिकेत तो पुनरागमन करणार आहे. मात्र 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील पाचव्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाणार आहे. येत्या फेब्रुवारीत न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका होणार असून जूनमध्ये विंडीज व अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
न्यूझीलंड संघ : केन विल्यम्सन (कर्णधार), कॉनवे, फिन अॅलेन, सीफर्ट, डॅरील मिचेल, फिलिप्स, चॅपमन, जोश क्लार्कसन, सँटनर, हेन्री, ईश सोधी, साऊदी, फर्ग्युसन, अॅडम मिल्ने, बेन सीअर्स.
Home महत्वाची बातमी पाकविरुद्धच्या मालिकेत विल्यम्सन न्यूझीलंडचा कर्णधार
पाकविरुद्धच्या मालिकेत विल्यम्सन न्यूझीलंडचा कर्णधार
वृत्तसंस्था/ ऑकलंड न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी केन विल्यम्सनकडे पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व सोपविले आहे. नऊ महिन्यापूर्वी विल्यम्सनला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मागील महिन्यात बांगलादेशविरुद्धची वनडे व टी-20 मालिका हुकली होती. 33 वर्षीय विल्यम्सनने शस्त्रक्रियेनंतर भारतात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पुनरागमन केले होते. मात्र गेल्या महिन्यात मायदेशात झालेल्या मालिकांत त्याला विश्रांती देण्यात […]
