विराट कोहली आयपीएल 2024 खेळणार का? किंग कोहलीबद्दल सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे रांची येथे एका स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमात आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले की विराट आयपीएल खेळणार की नाही? तर गावस्कर म्हणाले, ‘तो खेळेल का? काही कारणांमुळे सध्या तो खेळत नाही. कदाचित तो आयपीएलही खेळणार नाही.’ आयपीएलच्या १७ व्या हंगामाला २२ मार्चपासून आयपीएल सुरूवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नईमध्ये गतविजेत्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि कोहलीची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. त्यामुळे आरसीबीच्या चाहंत्याच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे. किंग कोहलीने काही दिवसापूर्वीच आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्याने तो आणि अनुष्का दुसऱ्या आई-बाबा झाल्याची माहिती देताना पुत्ररत्न झाल्याची माहिती दिली होती.
Home महत्वाची बातमी विराट कोहली आयपीएल 2024 खेळणार का? किंग कोहलीबद्दल सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य
विराट कोहली आयपीएल 2024 खेळणार का? किंग कोहलीबद्दल सुनील गावसकरांचं मोठं वक्तव्य
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर हे रांची येथे एका स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमात आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आले की विराट आयपीएल खेळणार की नाही? तर गावस्कर म्हणाले, ‘तो खेळेल का? काही कारणांमुळे सध्या तो खेळत नाही. कदाचित तो आयपीएलही खेळणार नाही.’ आयपीएलच्या १७ व्या हंगामाला २२ मार्चपासून आयपीएल सुरूवात होणार आहे. या […]
