मनपा इमारतीच्या गळतीकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का?

इमारतीच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी बेळगाव : महानगरपालिकेची इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. मात्र, अल्पावधीतच या इमारतीमध्ये असलेल्या विविध विभागांमध्ये पावसाळ्यात गळतीला सुरुवात झाली आहे. यामुळे या इमारतीच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इमारतीची उभारणी करून काही वर्षे उलटली असताना गळती लागल्याने संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेतील आश्रय विभाग, पहिल्या मजल्यावरील बैठकीचा […]

मनपा इमारतीच्या गळतीकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का?

इमारतीच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी
बेळगाव : महानगरपालिकेची इमारत अलीकडेच बांधण्यात आली आहे. मात्र, अल्पावधीतच या इमारतीमध्ये असलेल्या विविध विभागांमध्ये पावसाळ्यात गळतीला सुरुवात झाली आहे. यामुळे या इमारतीच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इमारतीची उभारणी करून काही वर्षे उलटली असताना गळती लागल्याने संबंधित कंत्राटदार तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेतील आश्रय विभाग, पहिल्या मजल्यावरील बैठकीचा विभाग, प्रशासकीय विभाग परिसरात काही ठिकाणी भिंतीवरून पाणी गळत आहे. त्यामुळे भिंतींना बुरशी धरत आहे. जर अशाच प्रकारे गळती राहिली तर मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा याकडे आता वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इमारतीच्या आवारामध्ये काँक्रीटचा रस्ता तसेच पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. तेदेखील योग्यरीत्या बसविण्यात आले नाहीत. प्रवेशद्वारावरच पाणी साचत आहे. त्यामधून वाहनांना ये-जा करावी लागत आहे. शहराचे व्यवस्थापन करणाऱ्या महानगरपालिकेच्या इमारतीची व परिसराची अवस्था दयनीय झाल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.