हिवाळी अधिवेशनासाठी होणार 20 कोटींचा चुराडा?
मागील वर्षी 15.30 कोटी खर्च : यंदा 10 टक्क्याने अधिक खर्च होण्याची शक्यता
बेळगाव : बेळगाववर हक्क दाखविण्यासाठी कर्नाटक राज्य सरकार येथील सुवर्णसौधमध्ये प्रतिवर्षी हिवाळी अधिवेशनचे आयोजन करीत असते. अधिवेशनाच्या 10 ते 12 दिवसांच्या काळात काही तासच कामकाज चालत असते. पण, अधिवेशनाचा एपूण खर्च पाहता तो कोट्यावधीचा असतो. जनतेच्या पैशाचा चुराडा करीत हिवाळी अधिवेशनातून सरकार नेमके साध्य तरी काय करते, असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहात नाही. यंदाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे. यातील 13 व 14 डिसेंबर हे दोन दिवस सुटीचे असून उर्वरित 10 दिवस विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज? चालणार आहे. दहा दिवसांच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी असे तब्बल 8,500 जणांचा मुक्काम बेळगावात राहणार आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्या आतापासूनच कामाला लागल्या आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्यांचे चहापान, भोजन, निवास, वाहनभाडे यासारखा एकूण खर्च मागील अधिवेशनाच्या तुलनेत यंदा 10 ते 20 टक्क्याने वाढणार आहे. मागील वर्षी एकूण खर्च 15.30 कोटी झाला होता. यंदा 20 कोटी ऊपये खर्च येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मोठे लॉज, रेस्टॉरन्ट, वसतिगृहांच्या खोल्यांचे दर (भाडे) अधिवेशन काळात वाढविण्यात येत असतात. यंदाही हीच परिस्थिती आहे. 2021 मधील अधिवेशनासाठी 13.85 कोटी ऊ., 2022 मध्ये 14.20 कोटी ऊ., 2023 मध्ये 16.50 कोटी ऊपये तर 2024 मध्ये 15.30 कोटी म्हणजे 1 कोटी 20 लाख ऊ. खर्च कमी आला होता. यावर्षी मात्र 4 ते 5 कोटी ऊ. अधिक खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वायफळ खर्चावर नियंत्रणासाठी सूचना
यंदाच्या अधिवेशन काळात वायफळ खर्चावर नियंत्रणासाठी योजना तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागातून 8500 हून अधिक जणांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांना दिली. दिल्लीत घडलेल्या बॉम्बस्फोटच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हिवाळी अधिवेशनासाठी जादा पोलिसांची कुमक ठेवण्यात येणार असल्याचे शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी हिवाळी अधिवेशनासाठी होणार 20 कोटींचा चुराडा?
हिवाळी अधिवेशनासाठी होणार 20 कोटींचा चुराडा?
मागील वर्षी 15.30 कोटी खर्च : यंदा 10 टक्क्याने अधिक खर्च होण्याची शक्यता बेळगाव : बेळगाववर हक्क दाखविण्यासाठी कर्नाटक राज्य सरकार येथील सुवर्णसौधमध्ये प्रतिवर्षी हिवाळी अधिवेशनचे आयोजन करीत असते. अधिवेशनाच्या 10 ते 12 दिवसांच्या काळात काही तासच कामकाज चालत असते. पण, अधिवेशनाचा एपूण खर्च पाहता तो कोट्यावधीचा असतो. जनतेच्या पैशाचा चुराडा करीत हिवाळी अधिवेशनातून सरकार नेमके […]
