मनसे महायुतीत सहभागी होणार?

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली असून त्यांच्यात सुमारे तास भर चर्चा झाली. या मुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मनसे महायुतीत सहभागी होणार?

facebook

मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आज भेट झाली असून त्यांच्यात सुमारे तास भर चर्चा झाली. या मुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

या नेत्यांची भेट राज ठाकरे यांच्या निवास स्थानी शिवतीर्थ येथे झाली. या भेटीमुळे विविध चर्चाना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 

आज पुन्हा राजठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चांगल्या चर्चा रंगल्या आहे. 

या वर राज ठाकरे हे म्हणाले होते की भाजप बरोबर जाण्याचा प्रश्न होत नाही. कोणी कोणालाही भेटलं म्हणजे युती होत नाही. 

देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी या वर प्रतिक्रया दिली की आगामी काळात मनसे कुठे आणि कोणा सोबत असेल हे काहीच सांगू शकत नाही. राजठाकरेंशी आमची मैत्री आहे .आम्ही अनेक विषयांवर गप्पा करतो. आमच्या गाठी भेटी होत असतात. राज ठाकरे अनेकदा सूचना देखील करतात आणि टीकाही करतात. ते आमच्या सोबत काम करतील की  नाही हे लवकरच समजेल. पण अद्याप या वर कोणताही निर्णय घेतला नाही. 

 

 Edited by – Priya Dixit 

 

Go to Source