मनोज जरांगे पाटील निवडणुक लढणार?
लोकसभा निवडणुकीच्या तारख्या जाहीर केल्या आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक 19 एप्रिल पासून सुरु होणार आहे. सध्या अंतरवाली सराटी येथे घडामोडीना वेग ला असून मराठा आरक्षण साठी लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. आपण एकत्र निवडणुका लढवणार का प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी योग्य वेळ आली की सांगू असे उत्तर दिले.
तसेच मनोज जरांगे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले समाज जर म्हणाला तर राजकारणात उतरणार मला हलक्यात घेऊ नका. 30 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करण्याचं मनोज जरांगे म्हणाले. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटीलांना लोकसभेला सोबत घेऊन जाण्याची शक्यता आहे. यावर दोघांनी आपले वक्तव्य दिले नाही. मात्र दोघांच्या भेटी बाबत चर्चा सुरु झाल्या आहे.
Edited by – Priya Dixit