केजरीवालना जामीन मिळणार की नाही?

सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणार फैसला ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मद्य धोरणप्रकरणी तिहार तुऊंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय शुक्रवार, 10 मे रोजी फैसला सुनावणार आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी आदेश देऊ, असे बुधवारच्या सुनावणीनंतर खंडपीठाने स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल यांच्या […]

केजरीवालना जामीन मिळणार की नाही?

सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणार फैसला
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मद्य धोरणप्रकरणी तिहार तुऊंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय शुक्रवार, 10 मे रोजी फैसला सुनावणार आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी आदेश देऊ, असे बुधवारच्या सुनावणीनंतर खंडपीठाने स्पष्ट केले.
अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मिळाल्यास मुख्यमंत्री म्हणून कोणताही निर्णय घेता येणार नसल्याची अट घालण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सकारात्मकता दर्शवली होती. मात्र, ईडीच्या वकिलांनी त्यांच्या जामिनाला आक्षेप घेतल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ईडीचा युक्तिवाद ऐकून घेतला. आता दोन्ही बाजूचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले असून आता न्यायालय शुक्रवारी केजरीवालांना जामीन द्यावा की नाही याबाबत निर्णय जाहीर करू शकते.