कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार : शिरोडकर

फोंडा : म्हादई नदी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकारने खड्डे खोदण्याचे काम सुरू केल्याचे चित्र गुगल मॅपद्वारे गोवा सरकारने टिपलेले आहे. जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी याप्रकरणी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाविरूद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणी अॅडव्होकेट जनरल (एजी) देविदास पांगम यांच्यांशी सल्लामसलत करून प्रवाह समितीच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पाहणी करण्याची मागणी […]

कर्नाटकविरुद्ध अवमान याचिका दाखल करणार : शिरोडकर

फोंडा : म्हादई नदी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्नाटक सरकारने खड्डे खोदण्याचे काम सुरू केल्याचे चित्र गुगल मॅपद्वारे गोवा सरकारने टिपलेले आहे. जलसंवर्धनमंत्री सुभाष शिरोडकर यांनी याप्रकरणी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाविरूद्ध अवमान याचिका दाखल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणी अॅडव्होकेट जनरल (एजी) देविदास पांगम यांच्यांशी सल्लामसलत करून प्रवाह समितीच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पाहणी करण्याची मागणी गोवा सरकारने केली आहे. आपले सरकार म्हादईप्रश्नी जागृत असून मागील दोन दिवसात म्हादई नदीच्या प्रवाहात कर्नाटकाच्या बाजूने खोदकाम केल्याचे आढळल्यानंतर तात्काळ ही कारवाई करण्यात आलेली आहे. येत्या जून महिन्यात म्हादई प्रकरणाची सुनवाणीची शक्यता आहे. गोव्याने कर्नाटकाविरूद्ध तिसऱ्यांदा अवमान याचिका दाखल केली असून अद्याप कोणतेच सकारात्मक संकेत गोव्यासाठी दिसत नसल्यामुळे गोमंतकीयांनी याप्रकरणी धास्ती घेतलेली आहे.