गोवा सरकारचे ‘जीएमआर’वर एवढे विशेष प्रेम कशासाठी ?

पणजी : गोवा सरकारचे ‘जीएमआर’वर विशेष प्रेम कशासाठी? पाशवी बहुमतावर आधारित मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील 6 महिन्यांत 108 कोटीची करवसुली करण्याऐवजी त्यावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातोय, याचाच अर्थ यामध्ये काहीतरी गफला आहे, असा संशय व्यक्त कऊन गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी डॉ. सावंत मंत्रिमंडळावर चौफेर टीका केली आहे. विजय सरदेसाई हे सध्या तिऊपतीला गेलेले […]

गोवा सरकारचे ‘जीएमआर’वर एवढे विशेष प्रेम कशासाठी ?

पणजी : गोवा सरकारचे ‘जीएमआर’वर विशेष प्रेम कशासाठी? पाशवी बहुमतावर आधारित मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील 6 महिन्यांत 108 कोटीची करवसुली करण्याऐवजी त्यावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातोय, याचाच अर्थ यामध्ये काहीतरी गफला आहे, असा संशय व्यक्त कऊन गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी डॉ. सावंत मंत्रिमंडळावर चौफेर टीका केली आहे. विजय सरदेसाई हे सध्या तिऊपतीला गेलेले आहेत. तिथून सायंकाळी त्यांनी गोव्यातील जनतेसाठी एक संदेश जारी कऊन गोव्यातील सरकारकडे बहुमत असल्याने ते वाट्टेल तो निर्णय घेत आहे, असे म्हटले आहे. जीएमआर कंपनीला दरमहा 18कोटी ऊपये माफ करण्याचा निर्णय म्हणजे सरकारला तोटा कऊन घेण्याचा प्रकार आहे. खुद्द मंत्रीमंडळ त्यावर शिक्कामोर्तब करतेय हे अत्यंत दुर्दैव आहे, असे म्हटले आहे. कोविड काळात काम बंद होते म्हणून त्यांना नुकसान भरपाई देण्याचे कारण जर डॉ. प्रमोद सावंत सांगत असतील तर इतर कंपन्यांना देखील अशीच सूट द्या, तुमचे प्रेम केवळ जीएमआर कंपनीवरच का?, असा निर्णय घेण्यामागे सरकार चालविणाऱ्यांचे जीएमआरकडे काहीतरी साटेलोटे असावे आणि हा फार मोठा गफला आहे, अशा शब्दांत सरदेसाई यांनी सरकारवर जोरदार टीका केली.