कोणाकडे आहेत किती कोटी?

श्रीपाद नाईक यांच्याकडे रु.10 कोटी,रमाकांत खलप यांच्याकडे 6.22 कोटी,विरियातो फर्नांडिस यांच्याकडे 1.95 कोटी पणजी : उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री आणि आताचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांची मालमत्ता गेल्या पाच वर्षात रु. 6.6 कोटीवरून रु. 10.8 कोटीपर्यंत वाढल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. वर्ष 2019 पासून वर्ष 2024 पर्यंत त्यांच्या […]

कोणाकडे आहेत किती कोटी?

श्रीपाद नाईक यांच्याकडे रु.10 कोटी,रमाकांत खलप यांच्याकडे 6.22 कोटी,विरियातो फर्नांडिस यांच्याकडे 1.95 कोटी
पणजी : उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार, केंद्रीय मंत्री आणि आताचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांची मालमत्ता गेल्या पाच वर्षात रु. 6.6 कोटीवरून रु. 10.8 कोटीपर्यंत वाढल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. वर्ष 2019 पासून वर्ष 2024 पर्यंत त्यांच्या मालमत्तेत सुमारे 61 टक्के वाढ झाली आहे. खासदारकीचे वेतन आणि आपला व्यवसायातून वार्षिक रु. 17 लाखाच्या आसपास रक्कम मिळत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रातून नमूद केले आहे. बँक खाते आणि ठेवी यांची एकूण रक्कम रु. 17 लाख असून शेअर्स, बॉंडस् यामध्ये रु. 22 लाख गुंतवण्यात आले आहेत. टपाल खाते व विमा कंपनीत रु. 3 लाखांची गुंतवणूक असून रु. 15 लाखांची वाहने आहेत. रु. 7 लाखाचे दागिने असून रु. 12 कोटीची कर्जे घेतली आहेत. याशिवाय रु. 19 लाखाची इतर मालमत्ता असून हातात रोख रक्कम रु. 1 लाख असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.  त्यांच्याकडे कृषी जमीन रु. 26 लाखांची, बिगर कृषी जमीन रु. 5.2 कोटीची, व्यावसायिक इमारती रु. 1.60 कोटी तर रहिवासी इमारतीची किंमत रु. 1.8 कोटी आहे. फिरती आणि स्थावर मालमत्ता मिळून त्यांचे एकूण मूल्य रु. 10 कोटी आहे. शिवाय रु. 51 लाख देणी असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
रमाकांत खलपांकडे 6.22 कोटी
काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आपल्याकडे सुमारे 6.22 कोटींची मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. खलप यांच्या बचत खात्यांमध्ये 1.07 कोटी ऊपये आहेत. बाँड्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये 45 लाख ऊपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची किंमत 3.60 लाख आहे, तर 3.47 कोटींची स्थावर मालमत्ता त्यांच्याकडे आहे.  त्यांच्या पत्नी निर्मला खलप यांच्याकडे अकरा कोटींहून अधिक मालमत्ता आहे. निर्मला यांच्याकडे सुमारे 11.53 कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे गुंतवणूक, बँक खाती, सोने व इतर मिळून 4.92 कोटी, तर 6.61 कोटींच्या जमिनी अशी मिळून 11.53 कोटींची मालमत्ता असल्याचेही प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.
विरियातो यांच्याकडे 1. 95 कोटी
काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्याकडे 1 कोटी 95 लाख ऊपयांची मालमत्ता आहे, असे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विरियातो यांचे 1 लाख 89 हजार ऊपयांचे कर्ज आहे. त्यांच्या फ्लॅट, जमीन अशा स्थावर मालमत्तेची किंमत 1 कोटी 23 लाख ऊपये आहे. त्यांच्याकडे 4 लाख 32 ऊपये किमतीचे सोने आहे. त्यांच्या हातात 38 हजार ऊपये रोख तर बँक खात्यात मिळून 1 लाख 62 हजार ऊपये आहेत. त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये सुमारे 57 लाख ऊपये गुंतवले आहेत. त्यांच्या पत्नी अनिता यांच्याकडे 3 कोटी 31 लाख ऊपयांची मालमत्ता आहे. एकूण 50 लाख ऊपयांची स्थावर मालमत्ता आहे. विरियातो व त्यांच्या पत्नी यांच्याकडे एकूण तीन चारचाकी वाहने असून त्यांची किंमत सुमारे 24.50 लाख ऊपये आहे. अनिता यांच्या नावे 15 लाख ऊपये किंमतीचे सोने असून त्यांच्या बँक खात्यात 37 लाख 39 हजार ऊपये आहेत. शेअर बाझार आणि म्युच्युअल फंडमध्ये मिळून 2 कोटी 7 लाख ऊपये त्यांनी गुंतवले आहेत. त्यांच्याकडे 41 हजार ऊपये रोख रक्कम आहे. विरियातो व त्यांच्या पत्नीकडे मिळून 5.30 कोटी ऊपयांची मालमत्ता असल्याचे विरियातो यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.