कोणती राज्ये,किती मतदारसंघ…

? राजस्थान (25 जागा), गुजरात (26 जागा), मध्यप्रदेश (29 जागा), छत्तीसगड (11 जागा), हिमाचल प्रदेश (4 जागा) आणि हरियाणा (10 जागा) या सहा राज्ये अशी आहेत की जेथे संपूर्ण राज्यांमध्ये केवळ भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष असतो. इतर पक्ष नाहीतच, किंवा असले तरी केवळ नाममात्र आहेत. या राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 105 जागा आहेत. […]

कोणती राज्ये,किती मतदारसंघ…

? राजस्थान (25 जागा), गुजरात (26 जागा), मध्यप्रदेश (29 जागा), छत्तीसगड (11 जागा), हिमाचल प्रदेश (4 जागा) आणि हरियाणा (10 जागा) या सहा राज्ये अशी आहेत की जेथे संपूर्ण राज्यांमध्ये केवळ भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष असतो. इतर पक्ष नाहीतच, किंवा असले तरी केवळ नाममात्र आहेत. या राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या 105 जागा आहेत.
? याशिवाय, आसामच्या 14 पैकी 12 जागा, उत्तर प्रदेशच्या 80 पैकी चार जागा, बिहारच्या 40 पैकी 8 जागा, पश्चिम बंगालच्या 42 पैकी 2 जागा, महाराष्ट्राच्या 48 पैकी 10 जागा, कर्नाटकच्या 28 पैकी 22 जागा, झारखंडच्या 14 पैकी 8 जागा, तेलंगणाच्या 17 पैकी 4 जागा, तामिळनाडूच्या 39 पैकी 4 जागा, केरळच्या 20 पैकी 4 जागा, केंद्रशासित प्रदेशांच्या 4 पैकी 3 जागा, गोव्यातील 2 पैकी 2 जागा आणि आसाम वगळता ईशान्य भारतातील 8 पैकी 5 जागा, अशा 88 आणखी जागांवर दोन्ही पक्षांमध्ये थेट संघर्ष असतो. या जागांवर काहीवेळा इतर पक्षांचे उमेदवारही असतात पण ते फारसे स्पर्धेत नसतात.
? पंजाब आणि दिल्ली येथील स्थिती गेल्या काही वर्षांपासून वेगळी आहे. पूर्वी या दोन राज्यांपैकी दिल्लीत 7 पैकी 7 आणि पंजाबमध्ये 13 पैकी 3 मतदारसंघांमध्ये याच दोन पक्षांमध्ये थेट संघर्ष होत असे. पण आता आम आदमी पक्षाने या दोन्ही राज्यांमध्ये बस्तान बसविल्याने तेथे तिहेरी स्पर्धा होते.
? याखेरीज आणखी 25 ते 30 लोकसभा मतदारसंघ असे आहेत की जेथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये थेट स्पर्धा होऊ शकते. या जागांची संख्या, ते दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना कोणत्या आणि किती जागा कोणत्या राज्यांमध्ये सोडतील, यावर अवलंबून असते, असे आकडेवारी पहिल्यास कळून येते.
? अशा प्रकारे सर्वसाधारणत: 200 ते 225 किंवा काहीवेळा 200 ते 240 जागांवर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट संघर्ष होत आहे. ही स्थिती 1991 च्या लोकसभा निवडणुकीपासून आहे. प्रत्येक निवडणुकीत या थेट संघर्षाच्या जागांच्या संख्येत काही प्रमाणात बदलही होती. तथापि, गेल्या 1991 ते  2019 या आठ लोकसभा निवडणुका पाहिल्यास ही संख्या किमान 200 आहे.
निर्णायक अंतर केव्हापासून पडले…
? 2014 पासून या संघर्षात भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला निर्णायरित्या मागे टाकले असे दिसून येते. 1991 ते 2009 या कालावधीतील सहा लोकसभा निवडणुकांपैकी 1996, 1998 आणि 1999 या तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला मागे टाकले होते. 1991, 2004 आणि 2009 या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसची सरशी होती. म्हणजेच स्पर्धा साधरणत: तुल्यबळ होती.
? 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 214 मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात थेट संघर्ष झाला होता. त्यात भारतीय जनता पक्षाने तब्बल 180 मतदारसंघांमध्ये काँग्रेसला हरविले होते. काँग्रेसला केवळ 34 जागा मिळाल्याचे दिसून येते. याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाने या संघर्षात 85 टक्के यश मिळविले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मिळविलेल्या जागांमध्ये मोठे अंतर निर्माण झाले.
? 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात 224 मतदारसंघांमध्ये थेट संघर्ष झाला होता. त्यातही भारतीय जनता पक्षाने 188 जागा जिंकून पुन्हा मोठे यश प्राप्त केले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला अधिकृत विरोधी पक्ष होण्याइतक्याही जागा मिळाल्या नाहीत. अधिकृत विरोधी पक्ष होण्यासाठी 543 पैकी 55 जागा आवश्यक असतात, असे संसदेच्या नियमावलीत स्पष्ट केले आहे.