शहरात गृहलक्ष्मी अदालत कधी?

लाभार्थ्यांचा प्रश्न : योजना सुरळीत करण्यासाठी अदालत गरजेची बेळगाव : काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र गृहलक्ष्मी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यासाठी ग्रामीण भागात गृहलक्ष्मी अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे काही समस्या मार्गी लागल्या आहेत. मात्र शहरातील गृहलक्ष्मी लाभार्थ्यांसाठी अदालत कधी? असा प्रश्नही शहरातील गृहलक्ष्मी लाभार्थ्यांतून […]

शहरात गृहलक्ष्मी अदालत कधी?

लाभार्थ्यांचा प्रश्न : योजना सुरळीत करण्यासाठी अदालत गरजेची
बेळगाव : काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र गृहलक्ष्मी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यासाठी ग्रामीण भागात गृहलक्ष्मी अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे काही समस्या मार्गी लागल्या आहेत. मात्र शहरातील गृहलक्ष्मी लाभार्थ्यांसाठी अदालत कधी? असा प्रश्नही शहरातील गृहलक्ष्मी लाभार्थ्यांतून विचारला जात आहे. गृहलक्ष्मी योजनेतील त्रुटी दूर करून प्रत्येक लाभार्थ्यांपासून योजना सुरळीत पोहोचण्यासाठी डिसेंबर अखेरच्या आठवड्यात शिबिर आयोजित करण्यात आले होते. तीन दिवसांच्या या शिबिरामध्ये लाभार्थ्यांच्या त्रुटी दूर करून योजना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र हे शिबिर ग्रामीण भागासाठी मर्यादित होते. त्यामुळे शहरातील गृहलक्ष्मी लाभार्थ्यांसाठी शिबिर आयोजित करावे, अशी मागणी होत आहे.
गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेला ऑगस्टपासून चालना देण्यात आली आहे. मात्र काही लाभार्थ्यांना चार महिन्यांपासून निधीच मिळाला नाही. तर काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. त्यानंतर योजनेतील पुढील हप्ते मिळालेच नाहीत. त्यामुळे गृहलक्ष्मीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही लाभार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जात तर काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्रुटी आहेत. यासाठी अदालत आयोजित करून त्रुटी दूर कराव्यात आणि योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही लाभार्थ्यांतून होत आहे. काही लाभार्थ्यांची रेशनकार्डे नसल्याने या योजनेपासून दूर रहावे लागले आहे. मागील दोन वर्षांपासून नवीन रेशनकार्डचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्डाच्या कामाला कधी प्रारंभ होणार? असा प्रश्नही लाभार्थ्यांना पडला आहे. गृहलक्ष्मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामीण भागात आयोजित करण्यात आलेल्या अदालतचा काहींना लाभ झाला आहे. मात्र ही अदालत केवळ तीन दिवस आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे जनजागृतीअभावी अद्यापही काही जणांच्या त्रुटी कायम आहेत. त्यामुळे पुन्हा ग्रामीण भागात गृहलक्ष्मी अदालत आयोजित करावी, अशी मागणी होत आहे.
लवकरच अदालत आयोजित करणार
गृहलक्ष्मी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामीण भागात तीन दिवस शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बहुतांशी लाभार्थ्यांच्या त्रुटी दूर करून योजना सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातदेखील लवकरच गृहलक्ष्मी अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
-रेवती होसमठ-जिल्हा कार्यक्रम अधिकारी-महिला व बाल कल्याण खाते