काय सांगता,शेतकऱ्याच्या खात्यात आले 1 कोटी

बिहारमधील भागलपूर येथील नवगचिया येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात अचानक एक कोटी रुपये जमा झाले. ही रक्कम पाहिल्यानंतर शेतकऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला.बँकेने त्यांचे खाते गोठवले. मंगळवारी सकाळी शेतकऱ्याने स्वत: सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या …

काय सांगता,शेतकऱ्याच्या खात्यात आले 1 कोटी

बिहारमधील भागलपूर येथील नवगछिया येथील एका शेतकऱ्याच्या खात्यात अचानक एक कोटी रुपये जमा झाले. ही रक्कम पाहिल्यानंतर शेतकऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला.बँकेने त्यांचे खाते गोठवले. मंगळवारी सकाळी शेतकऱ्याने स्वत: सायबर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नवगछियाच्या गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिया गावात राहणारे 75वर्षीय शेतकरी संदीप मंडल यांचे एसबीआयमध्ये खाते आहे. त्यांनी सांगितले की, 26 डिसेंबर रोजी त्यांनी मुलाला पासबुक अपडेट करण्यासाठी पाठवले होते 28बँकेत पोहोचल्यावर मुलाला समजले की कुठून तरी त्याच्या खात्यात एक कोटी रुपये आले आहेत. यामुळे माझे खाते गोठवण्यात आले आहे.

 

 यानंतर मुलाने घरी येऊन मला माहिती दिली. मी बँकेत पोहोचलो आणि बँक मॅनेजरकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यावर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन अर्ज करा, असे सांगितले. तिथून रिपोर्ट येईल, मग खाते अनफ्रिज होईल. शेतकरी संदीप मंडलच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एसबीआय खात्यात फक्त त्यांची वृद्धापकाळ पेन्शन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची रक्कम येते संदीप मंडल म्हणाले की, पैसे कोठून आले याची मला कल्पना नाही. आम्ही शेती करतो. मला याबद्दल माहिती नाही. मी ऑगस्ट महिन्यापासून माझे पासबुक अपडेट केले नव्हते. माझ्या खात्यात एकूण 8400 रुपये होते. बँक मॅनेजर म्हणाले की, सायबर पोलीस स्टेशनला जा, तिथून रिपोर्ट घ्या, मग खाते उघडा. 

 

पोलिसांनी सांगितले , संदीप मंडल नावाचा एक व्यक्ती अर्ज घेऊन आला होता की त्याचे खाते फ्रिज करण्यात आले आहे. चौकशी केली असता अंदाजे एक कोटी रुपये त्याच्या खात्यात आल्याचे आढळूनआले. याप्रकरणी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यासंदर्भात बँकेला नोटीस मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तेलंगणा पोलिसांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू .

Edited By- Priya DIxit  

Go to Source