वाहतूक खात्याने कसली कंबर

– राज्यात विविध ठिकाणी 800 वाहतूक पोलीस तैनात प्रतिनिधी/ पणजी नववर्ष व नाताळ सणाची धामधूम सुरू झाल्याने वाहतूक पोलीस खात्याने खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील विविध भागांमध्ये 800 पोलीस तैनात करण्याची विशेष व्यवस्था केली आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत दिली. अधीक्षक कौशल यांनी सांगितले की, राज्यात नाताळ सण व […]

वाहतूक खात्याने कसली कंबर

– राज्यात विविध ठिकाणी 800 वाहतूक पोलीस तैनात
प्रतिनिधी/ पणजी
नववर्ष व नाताळ सणाची धामधूम सुरू झाल्याने वाहतूक पोलीस खात्याने खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील विविध भागांमध्ये 800 पोलीस तैनात करण्याची विशेष व्यवस्था केली आहे, अशी माहिती वाहतूक खात्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधीक्षक कौशल यांनी सांगितले की, राज्यात नाताळ सण व नववर्ष स्वागत समारंभासाठी राज्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे कोणताही अनूचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक व्यवस्था कोलमडू नये यासाठी राज्यभरात सुमारे 800 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेषत: कळंगुट व बागा या किनारी भागात वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी 500 पोलीस कर्मचारी वाहतुकीची व्यवस्था चोखपणे बजावत आहेत. परंतु सण व उत्सव काळात अतिरिक्त पर्यटक येत असल्याने याचा ताण वाहतुकीवर येतो आणि त्यामुळे ही व्यवस्था कोलमडू नये किंवा अनूचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त 300 पोलीस तैनात करण्यात येत असल्याचेही अक्षत कौशल यांनी सांगितले.
सध्या मनुष्यबळाची संख्या आणखी हवी असल्याने अतिरिक्त मनुष्यबळ पुरवावे, याबाबत संबंधितांकडे मागणी करण्यात आली आहे. कारण राज्यात अनेक ठिकाणी अऊंद रस्ते आहेत. अशा ठिकाणी चक्का जाम होण्यासारखे प्रकार घडतात. नागरिकांना लहान-मोठ्या अपघातांनाही सामोरे जावे लागते. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी तसेच अऊंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक खात्याने व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याची माहितीही अधीक्षक कौशल यांनी दिली.
17 ठिकाणी प्रशस्त वाहनतळ
राज्यात पर्यटन हंगामाला जोरदार सुरूवात झाल्याने कळंगुट आणि बागा या किनारी भागात पर्यटक मोठ्या संख्यने दाखल होत असल्याने कळंगुट व बागा येथे वाहने पार्क करण्यासाठी 17 ठिकाणी प्रशस्त वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. नाताळ सणानिमित्त विविध ठिकाणच्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गर्दी होणार असल्याने सुरळीत वाहतूक व्यवस्थेकडेही खात्याने विशेष लक्ष दिले असल्याचे कौशल यांनी सांगितले.