वलसाड डबलडेकर फास्ट पॅसेंजर बंद होणार
वलसाड (valsad) फास्ट पॅसेंजर या गाडीच्या डबल डेकरचा (double decker train) काळ संपुष्टात येत आहे. तसेच या पद्धतीचे डबल डेकर डबे उपलब्ध नसल्याने या गाडीला 5 जानेवारी 2025 पासून इतर एक्सप्रेस, शटल आणि पॅसेंजर गाडी प्रमाणे डबे जोडण्या चा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने (western railway) मंजूर केला आहे. या प्रस्तावात वलसाड, सुरत, बडोदा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांचे डब्बे कंपनीने वापरण्याचे ठरवले आहे. तसेच काही पॅसेंजर गाड्यांचे गंतव्यस्थान व थांबे बदलण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत.सध्या 11 डबल डेकर डबे असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर ला एकूण 18 डबे आहेत. यात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या रचनेत ही गाडी 22 डब्यांची करून त्यामध्ये 15 सिंगल डेकर डबे, तीन वाईस फर्स्ट क्लास व प्रत्येकी दोन मालवाहू डबे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. हा बदल 5 जानेवारी पासून करण्यात येणार आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर च्या डब्यांच्या रचनेत बदल करताना या गाडीचा रेक चा वापर वापी पॅसेंजर, वलसाड मुंबई (mumbai) फास्ट पॅसेंजर, वलसाड भरूच एक्सप्रेस, बलसाड विरार एक्सप्रेस, विरार (virar) सुरत शटल, सुरत विरार शटल व विरार वलसाड शटल या गाड्यांसाठी आलटून पालटून करण्याचा विचाराधीन आहे. यामुळे या सर्व गाड्यांच्या डब्ब्यांची रचना एकाच पद्धतीची ठेवण्यास पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे.या सुधारित रचनेमुळे 59024 वलसाड मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर, 59023 मुंबई सेंट्रल बलसाड फास्ट पॅसेंजर गाडी ची एक फेरी मुंबई सेंट्रल ते वापी (59045) व वापी ते मुंबई सेंट्रल (59046) अशी वाढविण्यात आली आहे. याच गाडीचा रेक वलसाड बडोदा एक्सपरीस (59049), बडोदा बलसाड एक्सप्रेस (59050), वलसाड विरार शटल (59040), विरार सुरत शटल (09001), सुरत विरार शटल (09002) व विरार वलसाड शटल (591039) या गाड्यांच्या करिता वापण्यात येणार आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर, वलसाड बडोदा पॅसेंजर तसेच विरार सुरत शटल या गाड्यांच्या दोन्ही दिशेच्या प्रवासाच्या वेळेमध्ये व थांबांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.या नव्या रचनेमुळे गेली अनेक वर्ष मुंबई सेंट्रल यार्डात दिवसभर उभी राहणारा वलसाड फास्ट पॅसेंजर चा गाडी ही साखळी पद्धतीने इतर गाड्यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे दिसून येत आहे. हेही वाचामुंबईतील किमान तापमानात घटमंत्रालयात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध
Home महत्वाची बातमी वलसाड डबलडेकर फास्ट पॅसेंजर बंद होणार
वलसाड डबलडेकर फास्ट पॅसेंजर बंद होणार
वलसाड (valsad) फास्ट पॅसेंजर या गाडीच्या डबल डेकरचा (double decker train) काळ संपुष्टात येत आहे. तसेच या पद्धतीचे डबल डेकर डबे उपलब्ध नसल्याने या गाडीला 5 जानेवारी 2025 पासून इतर एक्सप्रेस, शटल आणि पॅसेंजर गाडी प्रमाणे डबे जोडण्या चा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने (western railway) मंजूर केला आहे.
या प्रस्तावात वलसाड, सुरत, बडोदा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांचे डब्बे कंपनीने वापरण्याचे ठरवले आहे. तसेच काही पॅसेंजर गाड्यांचे गंतव्यस्थान व थांबे बदलण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत.सध्या 11 डबल डेकर डबे असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर ला एकूण 18 डबे आहेत. यात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या रचनेत ही गाडी 22 डब्यांची करून त्यामध्ये 15 सिंगल डेकर डबे, तीन वाईस फर्स्ट क्लास व प्रत्येकी दोन मालवाहू डबे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
हा बदल 5 जानेवारी पासून करण्यात येणार आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर च्या डब्यांच्या रचनेत बदल करताना या गाडीचा रेक चा वापर वापी पॅसेंजर, वलसाड मुंबई (mumbai) फास्ट पॅसेंजर, वलसाड भरूच एक्सप्रेस, बलसाड विरार एक्सप्रेस, विरार (virar) सुरत शटल, सुरत विरार शटल व विरार वलसाड शटल या गाड्यांसाठी आलटून पालटून करण्याचा विचाराधीन आहे.
यामुळे या सर्व गाड्यांच्या डब्ब्यांची रचना एकाच पद्धतीची ठेवण्यास पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे.या सुधारित रचनेमुळे 59024 वलसाड मुंबई सेंट्रल फास्ट पॅसेंजर, 59023 मुंबई सेंट्रल बलसाड फास्ट पॅसेंजर गाडी ची एक फेरी मुंबई सेंट्रल ते वापी (59045) व वापी ते मुंबई सेंट्रल (59046) अशी वाढविण्यात आली आहे.
याच गाडीचा रेक वलसाड बडोदा एक्सपरीस (59049), बडोदा बलसाड एक्सप्रेस (59050), वलसाड विरार शटल (59040), विरार सुरत शटल (09001), सुरत विरार शटल (09002) व विरार वलसाड शटल (591039) या गाड्यांच्या करिता वापण्यात येणार आहे.
वलसाड फास्ट पॅसेंजर, वलसाड बडोदा पॅसेंजर तसेच विरार सुरत शटल या गाड्यांच्या दोन्ही दिशेच्या प्रवासाच्या वेळेमध्ये व थांबांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.
या नव्या रचनेमुळे गेली अनेक वर्ष मुंबई सेंट्रल यार्डात दिवसभर उभी राहणारा वलसाड फास्ट पॅसेंजर चा गाडी ही साखळी पद्धतीने इतर गाड्यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे दिसून येत आहे.हेही वाचा
मुंबईतील किमान तापमानात घट
मंत्रालयात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर निर्बंध