अतिरिक्त रेल्वे लाईनसाठी पश्चिम रेल्वे 166 झाडे तोडणार

मीरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) च्या हद्दीतील एकूण 166 झाडे बोरिवली (borivali) आणि विरार (virar) दरम्यान नियोजित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या मार्गात आहेत. मीरा-भाईंदर (bhayandar) महानगरपालिकेच्या सूचनेनुसार त्यापैकी 136 झाडे (trees) तोडली जातील आणि 30 झाडे जवळच्या परिसरात लावली जातील. सध्या, 2,612 खारफुटींची (mangroves) तोड सुरू झाली आहे. दहिसर आणि मीरा रोड दरम्यानचा हा भूभाग मोकळा झाल्यामुळे झाडे लावण्याची प्रक्रिया देखील त्याच वेळी पूर्ण केली जात आहे. मीरा-भाईंदरच्या महानगरपालिकेने शुक्रवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये पालिकेने पश्चिम रेल्वेच्या (western railway) प्रकल्पाला मान्यता देण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे. तसेच रहिवाशांना सात दिवसांच्या आत कोणताही आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या सूचनेत पश्चिम रेल्वेच्या (WR) मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्प्या IIA अंतर्गत भाईंदर स्टेशन ते पाणजू बेट दरम्यानच्या पट्ट्याचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकल्पांसाठी जी झाडे तोडली जाणार आहेत त्यामध्ये नारळ, पिंपळ, बदाम, नीलगिरी, अशोका, भेंडी, गुलमोहर, खजूर, आंबा इत्यादी जातींच्या झाडांचा समावेश आहे. तसेच पुनर्लावणीसाठी चिन्हांकित केलेल्या काही झाडांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक वाहतूक प्रकल्पासाठी 2,612 खारफुटी काढून टाकण्यास परवानगी दिली. न्यायालयाने पश्चिम रेल्वेला खारफुटीजवळील 7,823 भरपाई देणाऱ्या झाडांची लागवड आणि देखभाल पूर्ण करण्याचे आश्वासन सादर करण्याचे निर्देश दिले होते. पश्चिम रेल्वे बोरिवली आणि विरार दरम्यान अंदाजे 2,184 कोटी खर्च करून दोन मार्गांचे बांधकाम करत आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) या प्रकल्पाला मान्यता दिली होती. परंतु पर्यावरणाचे ऱ्हास कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 20 अटींचे पालन करावे लागेल असे म्हटले होते. 26 किमी लांबीच्या या मार्गांमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. मुंबई रेल विकास महामंडळ हा प्रकल्प राबवत आहे. तसेच डिसेंबर 2027 पर्यंत तो पूर्ण करण्याचे पश्चिम रेल्वेचे उद्दिष्ट आहे.हेही वाचा श्रीकांत शिंदे यांना भाजपचा मोठा धक्का सलग दुसऱ्या दिवशीही सीएनजी पुरवठा ठप्प

अतिरिक्त रेल्वे लाईनसाठी पश्चिम रेल्वे 166 झाडे तोडणार

मीरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) च्या हद्दीतील एकूण 166 झाडे बोरिवली (borivali) आणि विरार (virar) दरम्यान नियोजित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या मार्गात आहेत. मीरा-भाईंदर (bhayandar) महानगरपालिकेच्या सूचनेनुसार त्यापैकी 136 झाडे (trees) तोडली जातील आणि 30 झाडे जवळच्या परिसरात लावली जातील.सध्या, 2,612 खारफुटींची (mangroves) तोड सुरू झाली आहे. दहिसर आणि मीरा रोड दरम्यानचा हा भूभाग मोकळा झाल्यामुळे झाडे लावण्याची प्रक्रिया देखील त्याच वेळी पूर्ण केली जात आहे. मीरा-भाईंदरच्या महानगरपालिकेने शुक्रवारी जारी केलेल्या नोटीसमध्ये पालिकेने पश्चिम रेल्वेच्या (western railway) प्रकल्पाला मान्यता देण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे. तसेच रहिवाशांना सात दिवसांच्या आत कोणताही आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या सूचनेत पश्चिम रेल्वेच्या (WR) मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्प्या IIA अंतर्गत भाईंदर स्टेशन ते पाणजू बेट दरम्यानच्या पट्ट्याचा उल्लेख करण्यात आला होता. या प्रकल्पांसाठी जी झाडे तोडली जाणार आहेत त्यामध्ये नारळ, पिंपळ, बदाम, नीलगिरी, अशोका, भेंडी, गुलमोहर, खजूर, आंबा इत्यादी जातींच्या झाडांचा समावेश आहे. तसेच पुनर्लावणीसाठी चिन्हांकित केलेल्या काही झाडांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक वाहतूक प्रकल्पासाठी 2,612 खारफुटी काढून टाकण्यास परवानगी दिली. न्यायालयाने पश्चिम रेल्वेला खारफुटीजवळील 7,823 भरपाई देणाऱ्या झाडांची लागवड आणि देखभाल पूर्ण करण्याचे आश्वासन सादर करण्याचे निर्देश दिले होते.पश्चिम रेल्वे बोरिवली आणि विरार दरम्यान अंदाजे 2,184 कोटी खर्च करून दोन मार्गांचे बांधकाम करत आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) या प्रकल्पाला मान्यता दिली होती. परंतु पर्यावरणाचे ऱ्हास कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 20 अटींचे पालन करावे लागेल असे म्हटले होते. 26 किमी लांबीच्या या मार्गांमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.मुंबई रेल विकास महामंडळ हा प्रकल्प राबवत आहे. तसेच डिसेंबर 2027 पर्यंत तो पूर्ण करण्याचे पश्चिम रेल्वेचे उद्दिष्ट आहे.हेही वाचाश्रीकांत शिंदे यांना भाजपचा मोठा धक्कासलग दुसऱ्या दिवशीही सीएनजी पुरवठा ठप्प

Go to Source