कडोलकर गल्ली येथे स्वामी समर्थ पालखीचे स्वागत
हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
बेळगाव : अक्कलकोटहून आगमन झालेल्या श्री स्वामी समर्थ पालखीचे कडोलकर गल्ली, बेळगाव स्वामी समर्थ भक्त मंडळ व भाविकांतर्फे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ करून मारुती गल्ली, गणपत गल्लीमार्गे मिरवणूक रात्री 8 वाजता कडोलकर गल्ली येथे आली. यानंतर महाआरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अक्कलकोटहून स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन दि. 12 रोजी शहापूर हट्टीहोळी गल्ली येथे झाले होते. यानंतर पालखी महाद्वार रोड, शास्त्राrनगर, गणेशपूर, पिरनवाडी येथे जाऊन त्यानंतर कडोलकर गल्ली येथे दि. 17 रोजी आली. यानंतर गल्ली व परिसरातील भाविकांतर्फे मिरवणूक सोहळ्यात सहभाग घेण्यात आला होता. महिलांनी टिपरी व फुगडी घालून पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. कडोलकर गल्ली येथे पालखी स्थानापन्न झाली. यानंतर दि. 18 रोजी पहाटे 6 वाजता अभिषेक व विधिवत पूजा करून पालखीचे प्रस्थान कार्वे व चंदगड भागात होणार आहे. कडोलकर गल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये बापट गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार आदी भागातील भाविकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कडोलकर गल्ली स्वामी समर्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भाविकांनी सहकार्य केले.
Home महत्वाची बातमी कडोलकर गल्ली येथे स्वामी समर्थ पालखीचे स्वागत
कडोलकर गल्ली येथे स्वामी समर्थ पालखीचे स्वागत
हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ बेळगाव : अक्कलकोटहून आगमन झालेल्या श्री स्वामी समर्थ पालखीचे कडोलकर गल्ली, बेळगाव स्वामी समर्थ भक्त मंडळ व भाविकांतर्फे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ करून मारुती गल्ली, गणपत गल्लीमार्गे मिरवणूक रात्री 8 वाजता कडोलकर गल्ली येथे आली. यानंतर महाआरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. […]