शिवप्रतिष्ठानतर्फे धर्मवीर ज्वालेचे स्वागत

वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला बेळगावात : ज्वाला सोमनाथ मंदिर येथे नागरिकांच्या दर्शनार्थ बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने  25 दिवसांपासून धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येत आहे. यानिमित्त गुरुवारी सांगली येथील वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला बेळगावमध्ये आणण्यात आली. धर्मवीर ज्वालेचे जोरदार स्वागत करण्यात आले. चन्नम्मा चौकपासून बाईक रॅली काढून धर्मवीर संभाजी चौक येथे ज्वालेचे स्वागत […]

शिवप्रतिष्ठानतर्फे धर्मवीर ज्वालेचे स्वागत

वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला बेळगावात : ज्वाला सोमनाथ मंदिर येथे नागरिकांच्या दर्शनार्थ
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने  25 दिवसांपासून धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येत आहे. यानिमित्त गुरुवारी सांगली येथील वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला बेळगावमध्ये आणण्यात आली. धर्मवीर ज्वालेचे जोरदार स्वागत करण्यात आले. चन्नम्मा चौकपासून बाईक रॅली काढून धर्मवीर संभाजी चौक येथे ज्वालेचे स्वागत करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण व्हावी यासाठी शिवप्रतिष्ठानच्यावतीने धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येत आहे. बुधवारी शिवप्रतिष्ठानचे धारकरी धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी सांगली येथे गेले होते. गुऊवारी सकाळी धर्मवीर ज्वाला बेळगावमध्ये आणण्यात आली. चन्नम्मा चौक येथून बाईक रॅली काढून धर्मवीर संभाजी चौकात ज्वाला आणण्यात आली. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते ज्वालेचे स्वागत करण्यात आले. यानंतर ज्वाला ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथे आणण्यात आली. पुढील दोन दिवस ही ज्वाला नागरिकांना दर्शनासाठी सोमनाथ मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. अधिकाधिक हिंदू बांधवांनी ज्वालेचे दर्शन घ्यावे, असे आवाहन किरण गावडे यांनी केले.
सोमवारी मूक पदयात्रा
रविवार दि. 7 रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथून धर्मवीर ज्वाला तालुक्मयातील प्रत्येक गावात नेण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून ज्वाला आपापल्या गावी घेऊन जावी. तसेच सोमवार दि. 8 रोजी सकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथून मूक पदयात्रा काढली जाणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंत्ययात्रा काढून धर्मवीर संभाजी चौक येथे ज्वाला शांत केली जाणार आहे.