न्यायालयाच्या विकासासाठी सरकारकडे पाठपुरावा करू

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन : बार असोसिएशनतर्फे सत्कार बेळगाव : न्यायालयातील समस्या टप्प्याटप्प्याने दूर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. दरवर्षी न्यायालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद केली जाईल, सध्या जेएमएफसी न्यायालयाला आणखी एक प्रवेशद्वार हवे आहे. ते तातडीने केले जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बार असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कारप्रसंगी सांगितले. जेएमएफसी न्यायालयातील समुदायभवनमध्ये हा कार्यक्रम झाला. […]

न्यायालयाच्या विकासासाठी सरकारकडे पाठपुरावा करू

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आश्वासन : बार असोसिएशनतर्फे सत्कार
बेळगाव : न्यायालयातील समस्या टप्प्याटप्प्याने दूर करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. दरवर्षी न्यायालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद केली जाईल, सध्या जेएमएफसी न्यायालयाला आणखी एक प्रवेशद्वार हवे आहे. ते तातडीने केले जाईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बार असोसिएशनने आयोजित केलेल्या सत्कारप्रसंगी सांगितले. जेएमएफसी न्यायालयातील समुदायभवनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर होते. बार असोसिएशन आणि वकिलांच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी न्यायालयाच्या आवारात विविध समस्या असून त्या दूर करण्याची मागणी वकिलांनी केली. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात नवीन कॅन्टीनला मंजुरी देण्यात आली होती. मात्र ते काम रेंगाळले आहे. तेव्हा ते काम तातडीने पूर्ण करण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील. पाणी समस्या, वकिलांसाठी नवीन चेंबरची उभारणी करणे यासह इतर मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी टप्प्याटप्प्याने या सर्व समस्या सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रारंभी बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर व इतर वकिलांच्या हस्ते पालकमंत्र्यांचा सत्कार केला. व्यासपीठावर विधान परिषद सदस्य नागराज यादव, आमदार राजू सेठ, कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. विनय मांगलेकर, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी, अॅड. शितल रामशेट्टी, अॅड. विजय पाटील, महिला प्रतिनिधी अॅड. आश्विनी हवालदार, अॅड. के. बी. नायक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.