कतार प्रकरणात आम्ही निर्दोष !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कतारने आपच्यावर केलेल्या हेरगिरीच्या आरोप प्रकरणात आम्ही पूर्णत: निर्दोष आहोत, असे प्रतिपादन भारतीय नौदलाचे माजी अधिकारी अमित नागपाल यांनी एका प्रदीर्घ मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आम्ही कधीच कतारच्या विरोधात भूमिका घेतलेली नव्हती. आम्हाला खोट्या आरोपांमध्ये अडकविण्यात आले होते, असे त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट करताना घटनाक्रमही मांडला आहे.
आम्ही न केलेल्या गुन्ह्यात आम्हाला अडकविण्यात आले आणि थेट फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यावेळी चिंता वाटली होती. मात्र, नंतर भारत सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे प्रयत्न आमची सुटका करण्यासाठी केले, त्यांना तोड नाही, अशीही प्रशंसा अमित नागपाल यांनी केली आहे.
प्रशिक्षण देण्यासाठी…
कतारच्या नौसैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही माजी अधिकारी कतार सरकारच्या अनुमतीने तेथे गेलो होतो. आमचे तेथील स्थलांतर पूर्णत: कायदेशीर होते. आमचे कामही आम्ही व्यवस्थित करीत होतो. अन्य कोणत्याही कामात आम्ही लक्ष घातले नव्हते. पण आमच्यावर खोटे आरोप झाले. त्याला आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत असावी, अशी टिप्पणी नागपाल यांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी कतार प्रकरणात आम्ही निर्दोष !
कतार प्रकरणात आम्ही निर्दोष !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली कतारने आपच्यावर केलेल्या हेरगिरीच्या आरोप प्रकरणात आम्ही पूर्णत: निर्दोष आहोत, असे प्रतिपादन भारतीय नौदलाचे माजी अधिकारी अमित नागपाल यांनी एका प्रदीर्घ मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आम्ही कधीच कतारच्या विरोधात भूमिका घेतलेली नव्हती. आम्हाला खोट्या आरोपांमध्ये अडकविण्यात आले होते, असे त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट करताना घटनाक्रमही मांडला आहे. आम्ही न केलेल्या गुन्ह्यात […]