कॅम्प परिसरात गळतीमुळे पाण्याची नासाडी
एलअँडटीचे दुर्लक्ष : नागरिक संतप्त
बेळगाव : शहर परिसरात कोठे ना कोठे जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. एकीकडे शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तर दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. कॅम्प येथील हाय स्ट्रीट रोडवर रस्त्यावरच गळती लागून पाणी वाया जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयांच्या पाणीपातळीत घट होत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र पाण्याची चणचण भासू लागली आहे. अशातच शहरात दररोज विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे. एलअँडटी कंपनीकडून तातडीने दुरुस्ती हाती घेतली जात नसल्याने पाण्याची नासाडी होऊ लागली आहे. काही भागात दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. पाणीपुरवठा करणारी एलअँडटी कंपनी दुरुस्तीबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. जलवाहिनी, नळ आणि इतर ठिकाणी पाणी वाया जाऊ लागले आहे. मान्सून तोंडावर आला असला तरी अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे पाणीप्रश्न कायम आहे. अशातच विनाकारण पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
Home महत्वाची बातमी कॅम्प परिसरात गळतीमुळे पाण्याची नासाडी
कॅम्प परिसरात गळतीमुळे पाण्याची नासाडी
एलअँडटीचे दुर्लक्ष : नागरिक संतप्त बेळगाव : शहर परिसरात कोठे ना कोठे जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. एकीकडे शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे तर दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. कॅम्प येथील हाय स्ट्रीट रोडवर रस्त्यावरच गळती लागून पाणी वाया जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप […]