मुंबई : पाण्याची टाकी फुटल्याने नऊ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
मुंबईतील (mumbai) नागपाडा येथील सिद्धार्थनगर येथे बुधवारी रात्री पाण्याची टाकी (water tank) फुटल्याने झालेल्या अपघातात नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तसेच अन्य तीन व्यक्ती जखमी (injured) झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला कामगार, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पाण्याचा दाब वाढल्याने टाकी फुटल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (brihanmumbai municipal corporation) सांगण्यात आले आहे.पालिका प्रशासनाकडून सिद्धार्थनगर येथील सफाई कामगारांसाठी निवारा योजनेंतर्गत घरे बांधण्यात येत आहेत. घरे बांधण्यासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी तेथे सिमेंटची टाकी बांधण्यात आली. पाण्याची टाकी रिकामी झाल्याने बुधवारी सकाळी त्यात पाणी सोडण्यात आले. त्यावेळी पाण्याचा दाब जास्त असल्याने सायंकाळी ही टाकी अचानक फुटली.टाकीभोवती असलेले कामगार आणि त्यांची मुले कोसळलेल्या भिंतीखाली सापडली. या अपघातात खुशी खातून (9), गुलाम रसूल (32), मिराज खातून (9), नजराना बीबी (33) आदी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या फौजिया रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच खुशीचा मृत्यू झाला. अन्य तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.घरांच्या बांधकामासाठी महापालिकेने (bmc) नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने संबंधित जखमी कामगारांना कामावर ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.हेही वाचाकल्याण बलात्कार प्रकरणात आरोपिचे संतापजनक कृत्यनव्या वर्षात पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता
Home महत्वाची बातमी मुंबई : पाण्याची टाकी फुटल्याने नऊ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
मुंबई : पाण्याची टाकी फुटल्याने नऊ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
मुंबईतील (mumbai) नागपाडा येथील सिद्धार्थनगर येथे बुधवारी रात्री पाण्याची टाकी (water tank) फुटल्याने झालेल्या अपघातात नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तसेच अन्य तीन व्यक्ती जखमी (injured) झाले आहेत.
जखमींमध्ये एक महिला कामगार, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पाण्याचा दाब वाढल्याने टाकी फुटल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (brihanmumbai municipal corporation) सांगण्यात आले आहे.
पालिका प्रशासनाकडून सिद्धार्थनगर येथील सफाई कामगारांसाठी निवारा योजनेंतर्गत घरे बांधण्यात येत आहेत. घरे बांधण्यासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी तेथे सिमेंटची टाकी बांधण्यात आली. पाण्याची टाकी रिकामी झाल्याने बुधवारी सकाळी त्यात पाणी सोडण्यात आले. त्यावेळी पाण्याचा दाब जास्त असल्याने सायंकाळी ही टाकी अचानक फुटली.
टाकीभोवती असलेले कामगार आणि त्यांची मुले कोसळलेल्या भिंतीखाली सापडली. या अपघातात खुशी खातून (9), गुलाम रसूल (32), मिराज खातून (9), नजराना बीबी (33) आदी जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने जवळच्या फौजिया रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच खुशीचा मृत्यू झाला. अन्य तीन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घरांच्या बांधकामासाठी महापालिकेने (bmc) नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने संबंधित जखमी कामगारांना कामावर ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.हेही वाचा
कल्याण बलात्कार प्रकरणात आरोपिचे संतापजनक कृत्य
नव्या वर्षात पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता