Satara News : सातारा शहरात पाणीप्रश्न सुटला; धरण प्रकल्पामध्ये अंतिम टप्पा

                                 जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कास धरणाची केली पाहणी सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची नुकतीच वाढवण्यात आली आहे. त्याच धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याच्या पाईपलाईनचे कामही अंतिम टप्यात आलेले आहे. हे काम अमृत २.० मधून […]

Satara News : सातारा शहरात पाणीप्रश्न सुटला; धरण प्रकल्पामध्ये अंतिम टप्पा

                                 जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कास धरणाची केली पाहणी
सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची नुकतीच वाढवण्यात आली आहे. त्याच धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याच्या पाईपलाईनचे कामही अंतिम टप्यात आलेले आहे. हे काम अमृत २.० मधून केले जात आहे. या सर्व बाबींची माहिती घेण्याकरता दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली.
त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून माहिती घेतली.प्रांताधिकारी आशिष बारकुल,नगरपालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे उपस्थित होते. कास धरण हे ऐतिहासिक असून त्याच्या बांधकामास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तेच धरण साताऱ्याची तहान भागवत असून धरणाची उंची वाढवल्याने पाणी प्रश्न संपूष्टात आलेला आहे. वाढती लोकसंख्या गृहीत धरून ही योजना सक्षम करण्याचे काम सुरु आहे. जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यटन वाढीच्या अनुषंगाने वेगवेगळे पॉईट विकसीत केलेले आहेत. त्याचीही माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिली गेली.