कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा पूलानजिक रस्त्यावर पाणी

 वाकरे प्रतिनिधी गुरुवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केलेल्या कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर बालिंगे पूल ते दोनवडे फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर शुक्रवारी पहाटे  भोगावती नदीच्या महापुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त असून वाहनांना सोडले जात नाही.दरम्यान रधानगरी धरण भरल्याने या धरणातील विसर्गामुळे कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर […]

कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर बालिंगा पूलानजिक रस्त्यावर पाणी

 वाकरे प्रतिनिधी

गुरुवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केलेल्या कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर बालिंगे पूल ते दोनवडे फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर शुक्रवारी पहाटे  भोगावती नदीच्या महापुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त असून वाहनांना सोडले जात नाही.दरम्यान रधानगरी धरण भरल्याने या धरणातील विसर्गामुळे कोल्हापूर- गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर बालिंगे पूल ते दोनवडे फाटा दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर सुमारे फूटभर पाणी आले आहे .त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र आज सकाळी दूध संस्थांनी धाडस करून कोल्हापूर शहराला आणि गोकुळला दुधाचा पुरवठा करण्यासाठी दूध शहराकडे पाठवले.या रस्त्यावरील पुरामुळे वाहतूक बंद झाली असून पुराचे पाणी उतरल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.