नेहरूनगर रोडवर पाणी गळती
विनाकारण पाण्याचा अपव्यय : एल अॅण्ड टी कंपनी उदासीन
बेळगाव : यंदा डिसेंबरपासूनच पाणी समस्या गंभीर होवू लागली आहे. तर दुसरीकडे शहरात पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विनाकारण पाणी वाया जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. नेहरूनगर येथील जेएनएमसीसमोर मागील कित्येक दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात पाण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने पाणी वाया जाऊ लागले आहे. दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी समस्या गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. नेहरूनगर येथील मुख्य रस्त्यावर जलवाहिनी फुटून पाण्याचा अपव्यय होवू लागला आहे. काँक्रिट रस्त्याची बांधणी करताना जलवाहिनी फुटली आहे. मात्र अद्याप दुरुस्ती न झाल्याने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. यंदा पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. जलाशय, तलाव आणि नदीची पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईचे सावट गडद झाले आहे. अशा स्थितीत पाणी बचतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जाऊ लागले आहे. शहरात दररोज पाण्याचा अपव्यय होवू लागला आहे. मुबलक पाण्याअभावी पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शिवाय भविष्यात पाणीटंचाई गंभीर बनणार आहे. काही ठिकाणी आतापासूनच टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. इतकी भीषण परिस्थिती असली तरी पाणीपुरवठा करणारी एलअॅण्डटी कंपनी पाण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.
Home महत्वाची बातमी नेहरूनगर रोडवर पाणी गळती
नेहरूनगर रोडवर पाणी गळती
विनाकारण पाण्याचा अपव्यय : एल अॅण्ड टी कंपनी उदासीन बेळगाव : यंदा डिसेंबरपासूनच पाणी समस्या गंभीर होवू लागली आहे. तर दुसरीकडे शहरात पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विनाकारण पाणी वाया जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. नेहरूनगर येथील जेएनएमसीसमोर मागील कित्येक दिवसांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात पाण्याचे […]
