वाशीममध्ये मुसळधार पावसामुळे बँकेत शिरले पाणी

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच राज्यातील वाशिम जिल्ह्यातही पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. बँक आणि एटीएममध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. बँकेच्या आत पाणी …

वाशीममध्ये मुसळधार पावसामुळे बँकेत शिरले पाणी

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच राज्यातील वाशिम जिल्ह्यातही  पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. बँक आणि एटीएममध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. बँकेच्या आत पाणी शिरल्याने ओल्या फायली बाहेर काढल्या जात असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे शेलूबाजार येथील स्टेट बँक व सेंट्रल बँक तसेच एटीएम व दुकाने आज पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली होती. तसेच येथील बँकेत पाणी शिरल्याने अनेक फाईल्स आणि कागदपत्रे भिजली. पाण्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, तर पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source