सरस्वतीनगर-इतर भागात सेवाभावी महिलांकडून टँकरद्वारे पाणी वितरण
हिंडलगा :
बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतीनगर गावची महालक्ष्मी यात्रा चालू होऊन चार दिवस झाले. सर्वत्र यात्रा साजरी केली जात आहे. यात्रा म्हटली की पाण्याची आवश्यकता जास्त असते. त्यामुळे पाणी अत्यंत गरजेचे आहे. या भागात नळ व
टाकीचे पाणी कमी पडत आहे. पाणी कमी पडत असल्याने याची दखल येथील सेवाभावी महिलांनी घेऊन लागलीच गेले दोन दिवस घरोघरी टँकरद्वारे पाण्याचे वितरण करण्यास प्रारंभ केला आहे. या महिलांमध्ये रेखा पाटील, वनिता भोगण, लक्ष्मी तेलंगी, शुभांगी निलजकर, निर्मला रवळोजी, छाया जाधव, सुलोचना रणनवरे, सुधा घेवडे, सुरेखा जाधव, जयश्री बाणेकर, रेखा देसाई, सायराबानू हुक्केरी (ग्रामपंचायत उपाध्यक्षा), प्रियंका पहाने, ज्योत्स्ना पाटील यांचा समावेश आहे. यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
Home महत्वाची बातमी सरस्वतीनगर-इतर भागात सेवाभावी महिलांकडून टँकरद्वारे पाणी वितरण
सरस्वतीनगर-इतर भागात सेवाभावी महिलांकडून टँकरद्वारे पाणी वितरण
हिंडलगा : बेनकनहळ्ळी, गणेशपूर, ज्योतीनगर गावची महालक्ष्मी यात्रा चालू होऊन चार दिवस झाले. सर्वत्र यात्रा साजरी केली जात आहे. यात्रा म्हटली की पाण्याची आवश्यकता जास्त असते. त्यामुळे पाणी अत्यंत गरजेचे आहे. या भागात नळ व टाकीचे पाणी कमी पडत आहे. पाणी कमी पडत असल्याने याची दखल येथील सेवाभावी महिलांनी घेऊन लागलीच गेले दोन दिवस घरोघरी […]
