चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यासह (maharashtra) देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतो. राज्यात थंडी कमी झाली. हेच नाही तर आता भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा (heavy rain) अंदाज आहे. गेले दोन दिवस राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा काहीसा कमी होऊन अनेक भागांत उकाडा सहन करावा लागत आहे. दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा देखील बसत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात गारठा जाणवणार नाही. याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले. याचबरोबर सध्या राज्यात पूर्वेकडून वारे वाहत आहेत. त्याचबरोबर आर्द्रताही वाढली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्याच्या तापमानात (temperature) वाढ झाली आहे. त्याप्रमाणे थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ही स्थिती साधारण पुढील पाच ते सात दिवस कायम राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पाऊस झाला. त्यानंतर मागील काही दिवसांपासून थंडी वाटत होती. आता पुन्हा एकदा तापमानात बदल झाला आहे. नागरिकांना उकाडा जाणवत आहे. त्यामध्येच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली आहे. आयएमडीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा वेगाने सक्रिय होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा काही दिवसात एका मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतो.या चक्रीवादळ (cyclone) प्रणालीमुळे, पुढील पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हेही वाचा मध्य रेल्वेचा कल्याण ते लोणावळा दरम्यान ब्लॉक वंचितची गॅस सिलेंडर चिन्हाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यासह (maharashtra) देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसतो. राज्यात थंडी कमी झाली. हेच नाही तर आता भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा (heavy rain) अंदाज आहे. गेले दोन दिवस राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा काहीसा कमी होऊन अनेक भागांत उकाडा सहन करावा लागत आहे. दिवसाच्या तापमानातही वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा देखील बसत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात गारठा जाणवणार नाही. याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले. याचबरोबर सध्या राज्यात पूर्वेकडून वारे वाहत आहेत. त्याचबरोबर आर्द्रताही वाढली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून राज्याच्या तापमानात (temperature) वाढ झाली आहे. त्याप्रमाणे थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. ही स्थिती साधारण पुढील पाच ते सात दिवस कायम राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पाऊस झाला. त्यानंतर मागील काही दिवसांपासून थंडी वाटत होती. आता पुन्हा एकदा तापमानात बदल झाला आहे.नागरिकांना उकाडा जाणवत आहे. त्यामध्येच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली आहे. आयएमडीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा वेगाने सक्रिय होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा काही दिवसात एका मोठ्या चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतो.या चक्रीवादळ (cyclone) प्रणालीमुळे, पुढील पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हेही वाचामध्य रेल्वेचा कल्याण ते लोणावळा दरम्यान ब्लॉकवंचितची गॅस सिलेंडर चिन्हाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Go to Source