5 कोटी खर्च केलेले तलाव-उद्यान पाहायचे आहे का?

कणबर्गी येथे या तुम्हीच पहा : उद्यान-तलावाची अवस्था दयनीय : जनतेतून तीव्र प्रतिक्रिया बेळगाव : कणबर्गी येथे तलावाचे सुशोभीकरण व उद्यानाची उभारणी करण्यासाठी 5 कोटी 24 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, या तलावाची आणि उद्यानाची अवस्था पाहता नेमका इतका खर्च करण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्हाला 5 कोटी खर्च केलेले उद्यान आणि तलाव पाहायचे असेल तर कणबर्गीला या, अशा […]

5 कोटी खर्च केलेले तलाव-उद्यान पाहायचे आहे का?

कणबर्गी येथे या तुम्हीच पहा : उद्यान-तलावाची अवस्था दयनीय : जनतेतून तीव्र प्रतिक्रिया
बेळगाव : कणबर्गी येथे तलावाचे सुशोभीकरण व उद्यानाची उभारणी करण्यासाठी 5 कोटी 24 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, या तलावाची आणि उद्यानाची अवस्था पाहता नेमका इतका खर्च करण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्हाला 5 कोटी खर्च केलेले उद्यान आणि तलाव पाहायचे असेल तर कणबर्गीला या, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आता उमटत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत कणबर्गी येथील तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. याचबरोबर उद्यानही निर्माण करण्यात आले. त्यामध्ये विविध साहित्य बसविण्यात आले. 2016 साली या कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर 2022 साली हे काम पूर्ण झाले, असे स्मार्ट सिटीचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, केवळ दोन वर्षातच या उद्यानातील साहित्य मोडकळीस आले आहे. याचबरोबर उद्यानाची कोणतीच देखभाल नसल्यामुळे येथील शोभेची झाडे खराब झाली आहेत. तलावाची अवस्थाही दयनीय झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत इतका मोठा खर्च करण्यात आला, मात्र तो संपूर्ण खर्च वाया गेला आहे. नेमका किती खर्च करण्यात आला आहे हे आता स्मार्ट सिटी व महानगरपालिकेनेच सांगावे, असा प्रश्नही जनतेतून उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.