वाघवडे रस्ता संपूर्ण खड्डेमय
वाहनधारकांची कसरत : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर /मजगाव
मच्छे ते वाघवडे रस्ता म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. मच्छे ते वाघवडे सुमारे 4 कि. मी.चा रस्ता संपूर्ण उखडल्याने रहदारीसाठी वाहनधारकांची अक्षरश: तारेवरची कसरत चालली आहे. कधी कोणाचा बळी जाईल हे मात्र सांगता येणार नाही. वारंवार प्रशासने व लोकप्रतिनिधींकडे सदर रस्त्याची तक्रार करूनही कोणीही अद्याप या रस्त्याची दखल घेतली नाही. या रस्त्यावरून मच्छे औद्योगिक वसाहतीला जाणारे शेकडो कामगार व उद्योजक ये-जा करीत असतात. तर वाघवडे, मार्कंडेयनगर, संतिबस्तवाड आदी गावचे नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. पण सध्या पावसामध्ये ये-जा करणे म्हणजे धोका पत्करूनच जावे लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून सदर रस्त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Home महत्वाची बातमी वाघवडे रस्ता संपूर्ण खड्डेमय
वाघवडे रस्ता संपूर्ण खड्डेमय
वाहनधारकांची कसरत : त्वरित दुरुस्तीची मागणी वार्ताहर /मजगाव मच्छे ते वाघवडे रस्ता म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. मच्छे ते वाघवडे सुमारे 4 कि. मी.चा रस्ता संपूर्ण उखडल्याने रहदारीसाठी वाहनधारकांची अक्षरश: तारेवरची कसरत चालली आहे. कधी कोणाचा बळी जाईल हे मात्र सांगता येणार नाही. वारंवार प्रशासने व लोकप्रतिनिधींकडे सदर रस्त्याची तक्रार करूनही कोणीही अद्याप या रस्त्याची दखल घेतली नाही. या […]