वाघवडे रवळनाथ-कलमेश्वर यात्रा उत्साहात
वार्ताहर/किणये
वाघवडे गावातील जागृत रवळनाथ-कलमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. या यात्रेला बुधवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यात्रेला मंगळवार दि. 3 रोजीपासून सुरुवात करण्यात आली. सायंकाळी मंदिराजवळ गाऱ्हाणा व देवपूजा कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांनी आपले नवस फेडले. वाघवडे गावापासून एक किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याशी निसर्गरम्य अशा परिसरात रवळनाथ व कलमेश्वर मंदिरे आहेत. दोन्ही देवस्थान जागृत असल्यामुळे मंदिराकडे येणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. गावात या यात्रेची तयारी गेल्या आठ दिवसापासून करण्यात आली होती. नातेवाईकांना निमंत्रण देणे, यात्रेसाठी लागणारे साहित्य खरेदी आदी कामांमध्ये गावकरी व्यस्त होते. बुधवार दि. 4 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. यानिमित्त सकाळी आठ ते बारा पर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आईक्रीम व विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. बालचमू व महिलांनी याचा आनंद लुटला.
Home महत्वाची बातमी वाघवडे रवळनाथ-कलमेश्वर यात्रा उत्साहात
वाघवडे रवळनाथ-कलमेश्वर यात्रा उत्साहात
वार्ताहर/किणये वाघवडे गावातील जागृत रवळनाथ-कलमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. या यात्रेला बुधवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यात्रेला मंगळवार दि. 3 रोजीपासून सुरुवात करण्यात आली. सायंकाळी मंदिराजवळ गाऱ्हाणा व देवपूजा कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांनी आपले नवस फेडले. वाघवडे गावापासून एक किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याशी निसर्गरम्य अशा परिसरात रवळनाथ व कलमेश्वर मंदिरे […]

