वडाळा : शाळेजवळ तीन विद्यार्थिनींचा विनयभंग
देशभरात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. तसेच स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असाच संतापजनक प्रकार वडाळ्यात घडला आहे. रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी वडाळा येथील शाळेजवळ तीन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध मुलांचे विनयभंग आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. पीडित मुलींचे वय 14 ते 15 वर्षे दरम्यान आहे. त्या शुक्रवारी शाळेत येत असताना तेथील बसस्थानकाजवळ एका अज्ञात व्यक्तीने एका मुलीचा विनयभंग केला. त्याने इतर दोन मुलींनाही सावध केले.मुली शाळेत आल्यावर त्यांनी हा प्रकार शिक्षिकेला सांगितल्यानंतर शाळेच्या वतीने तक्रार करण्यात आली. त्यानंतर आरएके मार्ग पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.हेही वाचाबाबा सिद्दीकींच्या हत्येमागील तिसरा आरोपी पुण्यातून अटकलक्ष द्या! कल्याण-डोंबिवलीत 15 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद
Home महत्वाची बातमी वडाळा : शाळेजवळ तीन विद्यार्थिनींचा विनयभंग
वडाळा : शाळेजवळ तीन विद्यार्थिनींचा विनयभंग
देशभरात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. तसेच स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असाच संतापजनक प्रकार वडाळ्यात घडला आहे. रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलिसांनी वडाळा येथील शाळेजवळ तीन शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीविरुद्ध मुलांचे विनयभंग आणि लैंगिक शोषणापासून संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. पीडित मुलींचे वय 14 ते 15 वर्षे दरम्यान आहे. त्या शुक्रवारी शाळेत येत असताना तेथील बसस्थानकाजवळ एका अज्ञात व्यक्तीने एका मुलीचा विनयभंग केला. त्याने इतर दोन मुलींनाही सावध केले.
मुली शाळेत आल्यावर त्यांनी हा प्रकार शिक्षिकेला सांगितल्यानंतर शाळेच्या वतीने तक्रार करण्यात आली. त्यानंतर आरएके मार्ग पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.हेही वाचा
बाबा सिद्दीकींच्या हत्येमागील तिसरा आरोपी पुण्यातून अटक
लक्ष द्या! कल्याण-डोंबिवलीत 15 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद