बिहारच्या पोलिसांवर प. बंगालमध्ये हल्ला

कोलकाता : गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी पश्चिम बंगालमधील विलायतीबारी येथे पोहोचलेल्या बिहारच्या किशनगंज पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलीस जखमी झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी किशनगंज टाऊन पोलीस स्थानकाचे प्रमुख संदीप कुमार यांनीही पाच राऊंड फायर केले. यावेळी झालेल्या संघर्षात गोळी लागून दोन जण जखमी झाले. पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या या […]

बिहारच्या पोलिसांवर प. बंगालमध्ये हल्ला

कोलकाता :
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी पश्चिम बंगालमधील विलायतीबारी येथे पोहोचलेल्या बिहारच्या किशनगंज पोलिसांच्या पथकावर संतप्त जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात पाच पोलीस जखमी झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी किशनगंज टाऊन पोलीस स्थानकाचे प्रमुख संदीप कुमार यांनीही पाच राऊंड फायर केले. यावेळी झालेल्या संघर्षात गोळी लागून दोन जण जखमी झाले. पोलीस आणि स्थानिकांमध्ये झालेल्या या चकमकीनंतर परिसरात काहीवेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.