96 मतदारसंघात आज मतदान
पाच केंद्रीय मंत्री, दोन माजी क्रिकेटपटूंसह 1,717 उमेदवार राजकीय भवितव्य आजमावणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार, 13 मे रोजी दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 जागांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली असून रविवारी सायंकाळी निवडणूक अधिकारी आपापल्या केंद्रावर दाखल होण्यासाठी रवाना झाले. या टप्प्यात 19 लाख मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आता सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडेल. लोकसभेच्या 543 जागांपैकी तिसऱ्या टप्प्यापर्यंत 284 जागांवर मतदान झाले आहे. 13 मे पर्यंत एकूण 380 जागांवर मतदान पूर्ण होईल. उर्वरित 3 टप्प्यात 163 जागांवर मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात देशातील 96 जागांसाठी एकूण 1,717 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात 1 लाख 92 हजार मतदान केंद्रांवर 17.70 कोटी मतदार मतदान करू शकतील. एकूण मतदारांपैकी 8.97 कोटी पुऊष आणि 8.73 कोटी महिला मतदार आहेत. चौथ्या टप्प्यात मतदार 1,717 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार असून त्यात पाच केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री, दोन क्रिकेटपटू आणि एक अभिनेते यांचा समावेश आहे.
आंधप्रदेश, ओडिशात विधानसभेसाठीही मतदान
चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या 96 मतदारसंघात मतदान होईल. त्यानुसार तेलंगणातून 17, आंध्रप्रदेशातून 25, उत्तर प्रदेशमधून 13, बिहारमधून पाच, झारखंडमधून चार, मध्यप्रदेशातून आठ, महाराष्ट्रातील 11, ओडिशातून चार, पश्चिम बंगालमधून आठ आणि जम्मू-काश्मीरमधून (श्रीनगर) लोकसभेच्या एका जागेवर सोमवारी मतदान होणार आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुमारे 17.48 लाख मतदार मतदान करण्यास पात्र आहेत आणि 24 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच आंध्रप्रदेश विधानसभेच्या 175 जागांवर आणि ओडिशा विधानसभेच्या 28 जागांवरही मतदान होणार आहे.
रिंगणातील दिग्गज नेते
या टप्प्यातील काही प्रमुख उमेदवारांमध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (कनौज, उत्तर प्रदेश) यांच्यासह केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग (बेगुसराय, बिहार), नित्यानंद राय (उजियारपूर, बिहार) आणि रावसाहेब दानवे (जालना, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण (दोघेही बहरामपूर, पश्चिम बंगाल), भाजपच्या पंकजा मुंडे (बीड, महाराष्ट्र), एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (हैदराबाद-तेलंगणा) आणि आंध्र प्रदेश राज्य काँग्रेस अध्यक्ष वायएस शर्मिला (कडाप्पा) रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा उत्तर प्रदेशातील खेरी मतदारसंघातून हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा मुलगा 2021 च्या लखीमपुरी हिंसाचार प्रकरणात आरोपी आहे. तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा पश्चिम बंगालच्या कृष्णनगरमधून पुन्हा संसदेत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेते-राजकारणी झालेले शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून रिंगणात उतरले असून त्यांची लढत भाजपचे ज्येष्ठ नेते एस. एस. अहलुवालिया यांच्याशी होणार आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या मते, या टप्प्यातील 1,717 उमेदवारांपैकी 21 टक्के म्हणजेच 360 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. 476 म्हणजेच 28 टक्के उमेदवार करोडपती आहेत. त्याच्याकडे एक कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची संपत्ती आहे. 24 जणांनी त्यांची संपत्ती शून्य घोषित केली आहे. या टप्प्यात देशातील दोन सर्वात श्रीमंत उमेदवार रिंगणात आहेत. आंध्रप्रदेशातील गुंटूरमधील टीडीपी उमेदवाराकडे 5,705 कोटी ऊपयांची संपत्ती आहे. तसेच तेलंगणातील चेवेल्ला मतदारसंघातील भाजप उमेदवाराकडे 4,568 कोटी ऊपयांची संपत्ती आहे. तसेच 274 उमेदवारांविरोधात खून आणि अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच 17 उमेदवार कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. त्याचवेळी 44 उमेदवारांविऊद्ध द्वेषयुक्त भाषणाशी संबंधित गुन्हे दाखल आहेत.
Home महत्वाची बातमी 96 मतदारसंघात आज मतदान
96 मतदारसंघात आज मतदान
पाच केंद्रीय मंत्री, दोन माजी क्रिकेटपटूंसह 1,717 उमेदवार राजकीय भवितव्य आजमावणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार, 13 मे रोजी दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 जागांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली असून रविवारी सायंकाळी निवडणूक अधिकारी आपापल्या केंद्रावर दाखल होण्यासाठी रवाना झाले. या टप्प्यात 19 लाख मतदान कर्मचारी […]