89 मतदारसंघात आज मतदान

दुसरा टप्पा : 1,206 उमेदवार रिंगणात : 13 राज्यांमध्ये निवडणूक वृत्तसंस्था /नवी दिल्ली लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमधील 89 जागांवर शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात केरळच्या सर्व 20 जागांवर 26 एप्रिललाच मतदान होत आहे. त्याशिवाय मध्यप्रदेशातील 7, राजस्थानच्या 13, महाराष्ट्रातील 8, त्रिपुरातील 1, मणिपूरमधील 1, पश्चिम बंगालमधील 3 […]

89 मतदारसंघात आज मतदान

दुसरा टप्पा : 1,206 उमेदवार रिंगणात : 13 राज्यांमध्ये निवडणूक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांमधील 89 जागांवर शुक्रवार, 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात केरळच्या सर्व 20 जागांवर 26 एप्रिललाच मतदान होत आहे. त्याशिवाय मध्यप्रदेशातील 7, राजस्थानच्या 13, महाराष्ट्रातील 8, त्रिपुरातील 1, मणिपूरमधील 1, पश्चिम बंगालमधील 3 आणि उत्तर प्रदेशच्या 8 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातही मतदान होणार आहे. तसेच आसाममधील पाच, बिहारमधील पाच, छत्तीसगडमधील तीन, जम्मू-काश्मीरमधील एक, कर्नाटकातील 14 जागांवर मतदान होणार आहे. एकूण 89 मतदारसंघांमध्ये 1,206 उमेदवार रिंगणात आहेत. दुसऱ्या टप्प्यात आज म्हणजेच 26 एप्रिल रोजी राहुल गांधी, हेमा मालिनी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी, काँग्रेसचे शशी थरूर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अऊण गोविल, नवनीत राणा, महेश शर्मा यांचे भवितव्यही दुसऱ्या टप्प्यातच ठरणार आहे. शशी थरूर तिऊवनंतपुरममधून तर राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 4 जागांसाठी मतदानाची वेळ बदलण्यात आली आहे. प्रचंड उष्णतेमुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. बांका, मधेपुरा, खगरिया आणि मुंगेरमध्ये सकाळी 7 वाजता मतदान होणार आहे. मात्र संध्याकाळी 6 वाजेची वेळ वाढवून सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून 50 टक्क्मयांहून अधिक मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. एकूण 251 निवडणूक निरीक्षणे तैनात करण्यात आली आहेत.
जवळपास 16 कोटी मतदार
दुसऱ्या टप्प्यात एकूण 16 कोटी मतदार आहेत. त्यासाठी एकूण 1.67 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये 8.08 कोटी पुऊष आणि 7.80 कोटी महिला मतदार आहेत. तर एकूण 5,969 तृतीयपंथी मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांचा आकडा 14.28 लाख आहे. 100 वर्षे वयाचे 42,226 मतदार आहेत. 14.7 लाख दिव्यांग मतदार आहेत.
2019 च्या निवडणुकीत भाजपला 89 पैकी 51 जागा
गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या टप्प्यात झालेल्या 89 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. एनडीएच्या मित्रपक्षांच्या खात्यात 8 जागा होत्या. तर काँग्रेसचे 21 खासदार विजयी झाले होते. याशिवाय उर्वरित जागा सीपीएम, बसपा आणि इतरांच्या वाट्याला गेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघात मतदान झाले होते. आता लोकसभा निवडणुकीसाठी आणखी 6 टप्पे शिल्लक आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जाहीर प्रचार बुधवारी सायंकाळी संपला. त्यानंतर गुरुवारी छुप्या प्रचाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून प्रचार झाला. लोकसभेच्या सर्व जागांसाठी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख चेहरे

राहुल गांधी (काँग्रेस) – वायनाड
शशी थरूर (काँग्रेस) – तिऊवनंतपुरम
एचडी कुमारस्वामी (जेडीएस) – मंड्या
हेमा मालिनी (भाजप) – मथुरा
अऊण गोविल (भाजप) – मेरठ
पप्पू यादव (काँग्रेस) – पूर्णिया
यदुवीर वाडियार (भाजप) – म्हैसूर
सुकांत मजुमदार (भाजप) – बालूरघाट
वैभव गेहलोत (काँग्रेस) – जालोर
राजीव चंद्रशेखर (भाजप) – तिऊवनंतपुरम
ओम बिर्ला (भाजप) – कोटा
गजेंद्रसिंह शेखावत (भाजप) – जोधपूर
मन्सूर अली खान (काँग्रेस) – बेंगळूर
तेजस्वी सूर्या (भाजप) – बेंगळूर दक्षिण
भूपेश बघेल (काँग्रेस) – राजनांदगाव
नवनीत कौर राणा (भाजप) – अमरावती