14 मतदारसंघांत आज मतदान

मतदार ठरविणार राज्यातील 247 उमेदवारांचे राजकीय भवितव्य : निवडणुकीची तयारी पूर्ण बेंगळूर : दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. 14 मतदारसंघांमध्ये 247 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य आज मतदार निश्चित करणार आहेत. मतदानासाठी एकूण 30,402 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. […]

14 मतदारसंघांत आज मतदान

मतदार ठरविणार राज्यातील 247 उमेदवारांचे राजकीय भवितव्य : निवडणुकीची तयारी पूर्ण
बेंगळूर : दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. 14 मतदारसंघांमध्ये 247 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे राजकीय भवितव्य आज मतदार निश्चित करणार आहेत. मतदानासाठी एकूण 30,402 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. एकूण 2 कोटी 88 लाख 19 हजार 342 जण मतदानासाठी पात्र आहेत. त्यात 1 कोटी 44 हजार 28 लाख 99 पुरुष तसेच 1 कोटी 43 लाख 88 हजार 176 महिला मतदार आणि 3,067 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, म्हैसूर राजघराण्याचे यदूवीर वडेयर, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू डी. के. सुरेश, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, माजी मंत्री व्ही. सोमण्णा, गोविंद कारजोळ यांच्यासह 247 उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. यामध्ये 226 पुरुष तर 21 महिला उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षाने सर्व 14 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. तर भाजप-निजदने युती केल्यामुळे भाजपने 11 तर निजदने 3 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. बसप, आम आदमी व इतर प्रादेशिक पक्षांनी देखील उमेदवार उभे केले आहेत.
सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून मतदारांना मतदान केंद्रे शोधण्यासाठी निवडणूक अॅप डाऊनलोड करता येईल. या अॅपवर मतदारांना मतदान केंद्र कोणते, वाहन कोठे पार्क करावे, याची माहिती मिळणार आहे. येथे मतदार ओळखपत्र देखील डाऊनलोड करून घेता येईल. निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 1 लाख 40 हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदानाच्या काळात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी बाळगण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी 50 हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या 65 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. आज मतदान होणाऱ्या मतदान केंद्रांपैकी 16,701 केंद्रांवर वेब कास्टींग होणार आहे. 1,370 बूथमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांमध्ये दुप्पट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या मतदारसंघांत होणार मतदान
उडुपी-चिक्कमंगळूर, हासन, मंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर-कोडगू, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर उत्तर, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर सेंट्रल, चिक्कबळ्ळापूर, कोलार
मतदारसंघनिहाय उमेदवार

मतदारसंघ            भाजप    काँग्रेस    निजद
उडुपी-चिक्कमंगळूर          कोटा श्रीनिवास पुजारी       जयप्रकाश हेगडे   —-
मंगळूर   कॅ. ब्रिजेश चौटा    आर. पद्मराज पुजारी           —–
तुमकूर   व्ही. सोमण्णा        मुद्दहनुमेगौडा       —-
चामराजनगर        एस. बालराज        सुनील बोस           —–
बेंगळूर ग्रामीण      डॉ. सी. एन. मंजुनाथ           डी. के. सुरेश         —–
बेंगळूर उत्तर         शोभा करंदलाजे   एम. व्ही. राजीव गौडा          —–
बेंगळूर सेंट्रल        पी. सी. मोहन        मन्सूर अली खान  —–
बेंगळूर दक्षिण       तेजस्वी सूर्या          सौम्या रे•ाr          —-
म्हैसूर-कोडगू       यदूवीर वडेयर      एम. लक्ष्मण           —–
मंड्या     ———–        वेंकटरमणेगौडा    एच. डी. कुमारस्वामी
चित्रदुर्ग   गोविंद कारजोळ  बी. एम. चंद्रप्पा     —–
हासन     ———–        एम. श्रेयस पटेल    प्रज्ज्वल रेवण्णा
कोलार   ———–        के. व्ही. गौतम       मल्लेश बाबू
चिक्कबळ्ळापूर    डॉ. के. सुधाकर    रक्षा रामय्या          —–

 

उमेदवार संख्या-247
मतदान केंद्रे-30,402
निवडणूक कर्मचारी-1.40 लाख
पोलीस फौजफाटा-50 हजार
पुरुष मतदार-1,44,28,099
महिला मतदार-1,43,88,176
तृतीयपंथी मतदार-3,067
एकूण मतदार -2,88,19,342