ऑल इंडिया बार असोसिएशन परीक्षेनंतरच मतदानाचा अधिकार
2010 पासून नियम : परीक्षा न दिलेल्या वकिलांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत विचार
प्रतिनिधी/ बेळगाव
वकिली पदवी घेतल्यानंतर सनद घेतली जाते. मात्र ही सनद घेण्यापूर्वी ऑल इंडिया बारची परीक्षा पास होणे गरजेचे आहे. 2010 पासून हाच नियम संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र बेळगाव न्यायालयातील 2010 नंतर सेवा बजाविणाऱ्या वकिलांनी ती परीक्षाच दिली नाही. अशा वकिलांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत विचार करण्यात येत असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील यांनी दिली आहे.
बेळगाव न्यायालयामध्ये जवळपास 3 हजारांहून अधिक वकील कार्यरत आहेत. बार असोसिएशनचे सदस्यत्वही त्यांनी घेतले आहे. मात्र बऱ्याच वकिलांनी ऑल इंडिया बार असोसिएशनची परीक्षा दिली नाही. त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकारदेखील देणे चुकीचे आहे. त्यासाठी आता अशा वकिलांची नावे मतदारयादीतून वगळण्याबाबत विचार सुरू आहे. वकील पदवी घेतल्यानंतर सनद घेतली जाते. सनदनंतर वकील सेवा बजाविण्यास मुभा होती. मात्र 2010 नंतर सदर नियम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे त्या नियमानुसार 2010 नंतर ज्यांनी पदवी घेतली आहे त्यांना ऑल इंडिया बार असोसिएशनची परीक्षा देणे बंधनकारक आहे.
याचबरोबर अनेकांनी तालुका बार असोसिएशनमध्ये आपली नावे नोंद केली आहेत. याचबरोबर जिल्हा बार असोसिएशनमध्येही त्यांनी नावे नोंदविली आहेत. त्यामुळे दोन ठिकाणी ते मतदान करत आहेत, हे देखील चुकीचे आहे. त्यामुळे एका बार असोसिएशनमधील मतदारयादीतून संबंधितांचे नाव कमी केले जाणार आहे. याबाबत निर्णय घेऊन त्याबाबतही कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. आता लवकरच बार असोसिएशनची निवडणूक जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या नियमांचे पालन करण्यासाठी बार असोसिएशन अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.
Home महत्वाची बातमी ऑल इंडिया बार असोसिएशन परीक्षेनंतरच मतदानाचा अधिकार
ऑल इंडिया बार असोसिएशन परीक्षेनंतरच मतदानाचा अधिकार
2010 पासून नियम : परीक्षा न दिलेल्या वकिलांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत विचार प्रतिनिधी/ बेळगाव वकिली पदवी घेतल्यानंतर सनद घेतली जाते. मात्र ही सनद घेण्यापूर्वी ऑल इंडिया बारची परीक्षा पास होणे गरजेचे आहे. 2010 पासून हाच नियम संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र बेळगाव न्यायालयातील 2010 नंतर सेवा बजाविणाऱ्या वकिलांनी ती परीक्षाच दिली नाही. अशा […]