मतदानावर बहिष्कार टाकलेल्या चापोलीत मतदान जनजागृती

खानापूर : गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकलेल्या तालुक्यातील जांबोटी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील चापोली येथे गुरुवारी जिल्हा, तालुका स्वीप कमिटीतर्फे, तसेच जांबोटी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चापोली येथे मतदान जनजागृती कार्यक्रम झाला. चापोली गावात रस्ता नसल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. याची दखल निवडणूक आयोगाने घेऊन स्वीप कमिटीला या ठिकाणी मतदान […]

मतदानावर बहिष्कार टाकलेल्या चापोलीत मतदान जनजागृती

खानापूर : गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकलेल्या तालुक्यातील जांबोटी ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील चापोली येथे गुरुवारी जिल्हा, तालुका स्वीप कमिटीतर्फे, तसेच जांबोटी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चापोली येथे मतदान जनजागृती कार्यक्रम झाला. चापोली गावात रस्ता नसल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता. याची दखल निवडणूक आयोगाने घेऊन स्वीप कमिटीला या ठिकाणी मतदान जागृती करावी, अशा सूचना केल्या होत्या. यासाठी जिल्हा, तालुका स्वीप कमिटीतर्फे या ठिकाणी मतदान जागृती कार्यक्रम राबविला. यावेळी जि. पं. नियोजन संचालक डॉ. एम. कृष्णराजू यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि गावात रस्ता नसल्याने गेल्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकल्याचे सांगितले. पण आता त्यांच्या गावापर्यंत चांगला रस्ता केला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यामुळे प्रत्येकाने न चुकता मतदान करावे, असे ते म्हणाले. जीआयपीच्या मुख्य नियोजन संचालिका गंगाधर दिवतारा यांनीही मार्गदर्शन केले. तालुका स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहागीरदार म्हणाल्या की, कोणत्याही कारणास्तव मतदानाची संधी वाया घालवू नका. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. आपल्या मतदानाचा हक्क बजावावा.
ओलमणी नरेगा कामाच्या ठिकाणी मतदान जागृती
त्यानंतर जांबोटी ग्रामपंचायत अंतर्गत ओलमणी गावातील नरेगा कार्यस्थळावर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जीआयपी प्रकल्प संचालक डॉ. एम. कृष्णराजू, जीआयपीच्या मुख्य नियोजन संचालक गंगाधर दिवतारा, तालुका स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहागीरदार यांनी मतदानाबाबत जनजागृती केली. लेखाधिकारी गंगा हिरेमठ यांनी उपस्थित कामगाराना सक्तीच्या मतदानाची शपथ दिली. नरेगा साहाय्यक रुपाली बडकुंद्री, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कुडची, प्रमोद गोडेकर, बाहुबली मेळवंकी, मुरगेश यक्कांची, महांतेश जंगटी, दत्तात्रेय चव्हाण, ग्रा. पं., सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.