मतदारयाद्या मराठीमध्ये उपलब्ध
म. ए. समितीला चुकांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन
बेळगाव : सीमाभागामध्ये मराठी भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मतदारयाद्या मराठीमध्ये उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर मराठी मतदारयाद्या उपलब्ध केल्या आहेत. याबरोबरच झालेल्या चुका सुधारल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म. ए. समितीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिले. अॅड. अमर येळ्ळूरकर व युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मराठी मतदार याद्यांसंदर्भात चर्चा केली. यापूर्वी युवा समितीकडून मतदारयाद्या मराठीमध्ये द्याव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेसाठी बोलाविले होते. याबाबत म. ए. समिती नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता मतदारयाद्या मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर याद्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी मतदारयाद्यांमध्ये झालेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी संबंधित अर्ज मराठीमध्येच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर चुकांची दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगून शक्य तेवढी मदत करू, असे आश्वासन दिले. यावेळी म. ए. समितीचे कार्यकर्ते अंकुश केसरकर, संतोष कृष्णाचे, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी मतदारयाद्या मराठीमध्ये उपलब्ध
मतदारयाद्या मराठीमध्ये उपलब्ध
म. ए. समितीला चुकांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन बेळगाव : सीमाभागामध्ये मराठी भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मतदारयाद्या मराठीमध्ये उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर मराठी मतदारयाद्या उपलब्ध केल्या आहेत. याबरोबरच झालेल्या चुका सुधारल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म. ए. समितीच्या नेत्यांना व […]