संगीत कलाकार संघाचा गायन-वादन कार्यक्रम

बेळगाव : संगीत कलाकार संघाच्या नववर्षाच्या कार्यक्रमाला गुरुवार दि. 11 पासून लोकमान्य रंगमंदिरात सुरुवात झाली. प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले, गायक प्रमोद कुलकर्णी, नंदन हेर्लेकर, प्रभाकर शहापूरकर, मुकुंद गोरे, संतोष कुलकर्णी व दीपक कुलकर्णी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. नुकतेच दिवंगत झालेले उस्ताद रशीद खाँ, पं. भवानी शंकर व बेळगावचे वामन वागुकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]

संगीत कलाकार संघाचा गायन-वादन कार्यक्रम

बेळगाव : संगीत कलाकार संघाच्या नववर्षाच्या कार्यक्रमाला गुरुवार दि. 11 पासून लोकमान्य रंगमंदिरात सुरुवात झाली. प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले, गायक प्रमोद कुलकर्णी, नंदन हेर्लेकर, प्रभाकर शहापूरकर, मुकुंद गोरे, संतोष कुलकर्णी व दीपक कुलकर्णी आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. नुकतेच दिवंगत झालेले उस्ताद रशीद खाँ, पं. भवानी शंकर व बेळगावचे वामन वागुकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमोद कुलकर्णी यांच्या सुगम संगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी मराठी, हिंदी भाषेतली भक्तीगीते सादर केली. त्यांना मुकुंद गोरे यांनी हार्मोनियमवर, संतोष कुलकर्णी यांनी तबल्यावर व गुरुराज राव यांनी तालवाद्यावर साथ दिली. त्यानंतर पं. रामदास पळसुले यांच्या स्वतंत्र तबलावादनाला सुरुवात झाली. वादनासाठी त्यांनी ताल झपतालाची निवड केली. विविध प्रकारच्या लयकारीने सुशोभित कायदे, परण, रेले, चक्करदार यांची गुंग करणारी त्यांची पेशकश सर्व रसिकांना आनंद देऊन गेली. योगेश रामदास यांनी त्यांना नगमासंगत केली. स्वाती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर शहापूरकर यांनी आभार मानले.