वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तपासनाक्यांना भेटी
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात दड्डी, नागनूर व चन्यानदड्डी येथील चेकपोस्टना गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद हे गुरुवारी मतमोजणी केंद्राच्या पाहणीसाठी चिकोडीला गेले होते. याचवेळी वेगवेगळ्या तपासनाक्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या मार्गावरील प्रत्येक वाहनाची तपासणी करावी, निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा देऊ नये, अशी सूचना तपासनाक्यावरील कर्मचाऱ्यांना करण्यात आली. यावेळी तपासनाक्यावर कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तपासनाक्यांना भेटी
वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तपासनाक्यांना भेटी
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात दड्डी, नागनूर व चन्यानदड्डी येथील चेकपोस्टना गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद हे गुरुवारी मतमोजणी केंद्राच्या पाहणीसाठी चिकोडीला गेले होते. याचवेळी वेगवेगळ्या तपासनाक्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या मार्गावरील […]
