विशाल परबांनी सावंतवाडीतील बूथवर दिल्या भेटी

सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज संपूर्ण जिल्हाभरात मतदान होत आहे. या मतदानाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युवा उद्योजक श्री विशाल परब सकाळी ७.३० वाजताच बाहेर पडून प्रत्येक बुथवर भेट देत आहे. सावंतवाडी बूथ क्रमांक १४९, १५० या ठिकाणी भेट देत त्यांनी बुथवर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ॲड.परिमल नाईक, नासिर […]

विशाल परबांनी सावंतवाडीतील बूथवर दिल्या भेटी

सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज संपूर्ण जिल्हाभरात मतदान होत आहे. या मतदानाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युवा उद्योजक श्री विशाल परब सकाळी ७.३० वाजताच बाहेर पडून प्रत्येक बुथवर भेट देत आहे. सावंतवाडी बूथ क्रमांक १४९, १५० या ठिकाणी भेट देत त्यांनी बुथवर उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ॲड.परिमल नाईक, नासिर शेख, ॲड.अनिल निरवडेकर, हरीश कोटेकर, ज्योतीताई पाटणकर आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उबाठा या पक्षात नेहमीप्रमाणे चुरस पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब प्रत्येक बूथ वर जाऊन मतदान कशा पद्धतीने होत आहे, याची माहिती घेत आहेत.